जगातला प्रत्येक जण थोडा तरी अतरंगी असतोच. एखादा अतिशहाणा दिसला की नकळत म्हटले जाते काय वाय झेड आहे. याच वाय झेड म्हणजे धम्माल, मस्ती, दंगा आणि मुख्य म्हणजे अॅटीट्यूड असलेल्यांसाठी समीर संजय विध्वंस घेऊन येत आहे त्याचा आगामी चित्रपट ‘YZ’.  डबल सीट या चित्रपटानंतर दिग्दर्शक समीर विध्वंस आणि क्षितीज पटवर्धन ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. –
गेले काही दिवस अतिशय अनोख्या पद्धतीने सोशल मिडियावर या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यात येत होती. त्यानंतर आता चित्रपटात असणा-या कलाकारांची ‘#YZओळखपरेड’ म्हणून एका व्हिडीओच्या माध्यमातून ओळख करून देण्यात आली आहे. यामध्ये सई ताम्हणकर, सागर देशमुख, पर्ण पेठे, अक्षय टंकसाळे यांचा समावेश आहे. सई या चित्रपटात सामान्य मुलीच्या वेशात दिसते. तर पर्ण आणि अक्षय एकदम वेस्टर्न लूकमध्ये यात पाहावयास मिळतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yz movie cast revealed