Zakir Hussain last Instagram Post : प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचे सोमवारी (१६ डिसेंबर २०२४) रोजी अमेरिकेत निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. ते दोन आठवड्यांपासून सॅन फ्रान्सिस्कोच्या रुग्णालयात उपचार घेत होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच चाहत्यांसह अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केले. दिवंगत झाकीर हुसेन यांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आहे.

झाकीर हुसेन यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. झाकीर हुसेन यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये निसर्गातील रम्य क्षण त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर करीत त्याला कॅप्शन दिली होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये झाकीर हुसेन यांनी अमेरिकेत ऑटोमन (शरद) ऋतूचा आनंद घेत असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यांनी एका व्हिडीओद्वारे त्यांच्या चाहत्यांना अमेरिकेतील हवामानात झालेल्या बदलाचा अनुभव दाखवला होता. या दिग्गज तबलावादकाला शरद ऋतूतील निसर्गाचे सौंदर्य पाहून आनंद झाला होता आणि त्यांनी ते क्षण आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले. त्यांच्या शेवटच्या पोस्टला त्यांनी ‘मी तुमच्याबरोबर सुंदर क्षण शेअर करत आहे’, अशी कॅप्शन दिली होती.

हेही वाचा…दिवंगत तबला वादक झाकीर हुसैन यांनी ‘या’ चित्रटांमध्येही केलं आहे काम, वाचा यादी

झाकीर हुसेन यांच्या निधनाच्या बातमीनंतर, अनेक चाहत्यांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले, “रेस्ट इन पीस…उस्तादजी.” दुसऱ्याने म्हटले, “अविश्वसनीय आहे… आरआयपी लॉर्ड.” आणखी एका चाहत्याने लिहिले, “तुमची कला आणि कलेसाठी तुमचे योगदान शतकानुशतके लक्षात ठेवले जाईल. भावपूर्ण श्रद्धांजली.

झाकीर हुसैन यांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट –

zakir hussain fans commented in his last post
झाकीर हुसेन यांच्या निधनाच्या बातमीनंतर,अनेक चाहत्यांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. (Photo Credit – Zakir Hussain Instagram)

‘पिंकविला’ने दिलेल्या वृत्तानुसार झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईतील माहीम येथे झाला होता. ते प्रख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखां यांचे सुपुत्र होते. लहानपणापासूनच झाकीर हुसेन यांना तबलावादनाची गोडी लागली होती. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांच्या वडिलांकडून तबलावादनाचे धडे घेण्यास सुरुवात केली. १२ व्या वर्षी त्यांनी मैफिलींमध्ये सादरीकरण सुरू केले.

हेही वाचा…Zakir Hussain : झाकीर हुसैन यांच्या निधनामुळे तबला पोरका, जागतिक किर्ती मिळवणाऱ्या कलावंताबाबत या गोष्टी माहीत आहेत का?

झाकीर हुसेन यांनी पंडित रविशंकर, अली अकबर खान, शिवकुमार शर्मा यांच्यासह भारतातील महान संगीतकारांबरोबर काम केले. तसेच त्यांनी ‘द बीटल्स’, यो-यो मा, चार्ल्स लॉयड, बेला फ्लेक, एडगर मेयर, मिकी हार्ट, जॉर्ज हॅरिसन व जॉन मॅकलॉफलिन यांसारख्या आंतरराष्ट्रीय कलाकारांबरोबर काम करीत भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक पातळीवर पोहोचवले.

Story img Loader