‘जंजीर’ चित्रपटाचा निर्माता अपूर्व लखिया आणि दक्षिण भारतीय अभिनेता राम चरण तेजा संजय दत्तला तुरूंगात भेटण्यासाठी परवानगी घेण्याच्या प्रयत्नात आहेत.
१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी संजय दत्त येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. ‘जंजीर’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये संजय दत्तने शेर खानची भूमिका केली आहे. मूळ चित्रपटात ही भूमिका महान अभिनेता प्राण यांनी साकारली होती.
विनापरवाना हत्यार बाळगल्याप्रकरणी न्यायालयाने संजय दत्तला ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. संजयने शिक्षेतील १८ महिने अगोदरच तुरुंगात काढले आहेत. त्याला कुटुंबीयांशिवाय अन्य कोणाला भेटण्याची परवानगी नसून, जर कुटुंबीयांशिवाय कोणाला त्यास भेटायचे असेल, तर न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता आहे. लखिया आणि तेजा तुरुंगात संजय दत्तला भेटण्यासाठी न्यायालयाला विनंती अर्ज देण्याची तयारीत आहेत.
टीम ‘जंजीर’ संजय दत्तला तुरुंगामध्ये भेटण्यास उत्सुक
'जंजीर' चित्रपटाचा निर्माता अपूर्व लखिया आणि दक्षिण भारतीय अभिनेता राम चरण तेजा संजय दत्तला तुरूंगात भेटण्यासाठी परवानगी घेण्याच्या प्रयत्नात आहेत.
First published on: 23-07-2013 at 03:43 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zanjeer team plans to visit sanjay dutt in prison