‘जंजीर’ चित्रपटाचा निर्माता अपूर्व लखिया आणि दक्षिण भारतीय अभिनेता राम चरण तेजा संजय दत्तला तुरूंगात भेटण्यासाठी परवानगी घेण्याच्या प्रयत्नात आहेत.
१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी संजय दत्त येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. ‘जंजीर’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये संजय दत्तने शेर खानची भूमिका केली आहे. मूळ चित्रपटात ही भूमिका महान अभिनेता प्राण यांनी साकारली होती.
विनापरवाना हत्यार बाळगल्याप्रकरणी न्यायालयाने संजय दत्तला ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. संजयने शिक्षेतील १८ महिने अगोदरच तुरुंगात काढले आहेत. त्याला कुटुंबीयांशिवाय अन्य कोणाला भेटण्याची परवानगी नसून, जर कुटुंबीयांशिवाय कोणाला त्यास भेटायचे असेल, तर न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता आहे. लखिया आणि तेजा तुरुंगात संजय दत्तला भेटण्यासाठी न्यायालयाला विनंती अर्ज देण्याची तयारीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा