मराठी चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट आहेत ज्यांनी चाहत्यांचा मनावर एक वेगळीच छाप उमटवली आहे. हे खास आणि जुने चित्रपट आजही चाहते तितक्याच आवडीने पाहतात. या चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘झपाटलेला.’ या चित्रपटात मराठीमधील लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बर्डे मुख्य भूमिकेत होते. त्यांच्यासोबत अभिनेत्री पूजा पवार देखील होती. पूजाने चित्रपटात लक्ष्मीकांत यांच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घातला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजही ‘झपाटलेला’ चित्रपट चाहते तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने पाहतात. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची भूमिका ही आजही चाहत्यांच्या चांगलीच पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे. आता चित्रपटातील लक्षाची पूजा दिसते तरी कशी? असा प्रश्न अनेक वेळा चाहत्यांना पडतो. चित्रपटात मराठमोळ्या अंदाजात दिसलेली पूजा खऱ्याखुऱ्या आयुष्यात अत्यंत मॉडेल आणि ग्लॅमरल अंदाजात दिसते. सध्या पूजा सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस आणि सुंदर फोटोंमुळे चर्चेत आहे.

आणखी वाचा : अभिनेत्याच्या मुलीनं उघड केलं बापाचं गुपित

आणखी वाचा : रिलेशनशिप स्टेटसबद्दल रिंकूनं सोडलं मौन, म्हणाली…

लक्ष्मीकांत बर्डे आणि पूजाने अनेक मराठी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यातील त्यांचे ‘झपाटलेला’, ‘माझा छकुला’, ‘चिकट नवरा’, ‘विदूषक’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष गाजले. या चित्रपटांमध्ये पूजाने लक्ष्मीकांत यांच्या कधी प्रेयसीची तर कधी पत्नीची भूमिका वटवली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zapatlela movie actress pooja pawar salunke now looks beautiful avb