अग्निपथ या चित्रपटात दिसलेली प्रसिध्द अभिनेत्री झरीना वहाब लवकरच एका बंगाली चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट कोलकाता शहराच्या उत्तर भागात आजही चालत असलेल्या वेश्या व्यवसायावर आधारीत आहे.
या चित्रपटाची कथा नाचणा-या मुलींवर आधारीत आहे, ज्यात मध्य कोलकाताच्या बोवबाजर येथील वेश्यालय कॉलनी पडद्यावर दिसणार आहे.
या चित्रपटात झरीना वहाब कोठ्याच्या मालकिणीची व्यक्तीरेखा साकारत आहे. ही व्यक्तीरेखा पडद्यावर हुबेहुब सादर करण्यासाठी तिने या परिससातील मुलींशी संपर्क साधून त्यांची जीवनशैली जाणून घेतली.
झरीनाचे म्हणणे आहे की, तिच्यासाठी ही भूमिका एकदम वेगळ्या स्वरूपाची आहे आणि विविधरंगी कोलकात्याला शास्त्रीय संगीताची एक समृध्द परंपरा आहे. तिच्या मते अशाप्रकारच्या चित्रपटासाठी ही एक योग्य जागा आहे.
सदर बंगाली चित्रपटात काम करत असलेली ५३ वर्षीय झरीना अतिशय खूष आहे, कारण तिच्या मते येथील दिग्दर्शक उत्कृष्ट दर्जाचे चित्रपट निर्माण करतात.
नेहाल मशहूर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या आधी नेहाल यांनी प्रसिध्द दिग्दर्शक बासु चटर्जी यांचे सहाय्यक म्हणून काम केले आहे. त्याचप्रमाणे तरूण मजूमदार यांच्याबरोबरसुध्दा त्यांनी काम केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा