फेब्रुवारी महिन्यात येणारा ‘व्हॅलेंटाइन डे’ आणि त्यानिमित्ताने सर्वत्र पसरलेले प्रेमाचे वारे लक्षात घेऊन ‘झी क्लासिक’ने प्रेम नायक म्हणून ओळखले जाणारे शम्मी कपूर यांच्या चित्रपटांचा महोत्सव आयोजित केला आहे. ‘मस्ताना शम्मी’ या महोत्सवामध्ये ९ ते १२ फेब्रुवारीदरम्यान दुपारी २.३० वाजता शम्मी कपूरचे चित्रपट दाखविले जाणार आहेत.
या महोत्सवाची सुरुवात १९७१च्या शम्मी कपूर, हेमा मालिनी,
राजेश खन्ना यांच्या रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘अंदाज’ या चित्रपटाने होणार आहे.
त्यानंतर ‘ब्रम्हचारी’, ‘प्रिन्स’, ‘प्रोफेसर’ असे त्यांचे गाजलेले चित्रपट या महोत्सवामध्ये दाखविण्यात येणार आहेत.