झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणून झी मराठी अवॉर्ड्सला ओळखले जाते. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. नुकतंच याच्या नामांकनाचा सोहळा पार पडला. झी मराठी अवॉर्ड्स २०२२ ची नॉमिनेशन पार्टी मुंबईत पार पडली. यावेळी कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याचे नामांकन जाहीर करण्यात आले. मात्र या नामांकनावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचे कारणही तसेच आहे.
‘झी मराठी’वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सुरुवातीपासूनच घराघरात लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत सातत्याने येणारे ट्वीस्ट यामुळे ती प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे हे दोघे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्यासोबतच परीची भूमिका साकारणारी बालकलाकार मायरा वायकुळलाही विशेष पसंती मिळत आहे. इतकंच नव्हे तर अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांमुळे मालिकेला चार चांद लागले आहेत. मात्र या मालिकेला सर्वोत्कृष्ट नायक या विभागात नामांकन देण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रेक्षक यावर टीका करताना दिसत आहे.
आणखी वाचा : “माझ्याशी वैर घ्यायचं नसतं वाघोबा…” सुमीत राघवन आणि अमेय वाघमध्ये वादाची ठिणगी; जाणून घ्या प्रकरण काय?
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील यश हे मुख्य पात्र अभिनेता श्रेयस तळपदे साकारताना दिसत आहे. या मालिकेमुळे श्रेयस तळपदेचा चाहता वर्ग चांगलाच वाढला आहे. त्याला घराघरात एक वेगळीच ओळख मिळाली आहे. विशेष म्हणजे अनेकांना यश हे पात्र आपल्यातील एक असल्याचे भासत आहे. त्यामुळे अनेक जण यश या पात्रावर भरभरुन प्रेम करताना दिसत आहे. यंदाच्या झी मराठी अवॉर्ड्स सोहळ्यात या मालिकेला सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट खलनायिका यांसारख्या विविध विभागात नामांकन देण्यात आले आहेत.
पण यातील महत्त्वाचा विभाग असलेला सर्वोत्कृष्ट नायक या विभागात या मालिकेला नामांकनच देण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी झी मराठी अवॉर्ड्स सोहळ्यावर तसेच झी मराठीवर नाराजी व्यक्त केली आहे. अनेक नेटकरी यावर कमेंट करताना दिसत आहे. काहींनी तर या सोहळ्यावर बहिष्कार टाका, असेही म्हटले आहे. यातील काहींनी पट्यासाठी म्हणजे अभिनेता स्वप्निल जोशीसाठी श्रेयस तळपदेला डावलले असा आरोपही केला आहे.
आणखी वाचा : अमेय वाघ आणि सुमीत राघवनच्या वादावर अखेर पडदा, कारण आले समोर
आणखी वाचा : “वाघ आणि मराठे सहसा कोणाच्या वाट्याला जात नाही, पण….” ‘शिवप्रताप गरुडझेप’च्या डायलॉगची प्रेक्षकांना भूरळ
दरम्यान या संपूर्ण प्रकरणी अद्याप झी मराठी वाहिनीकडून काहीही स्पष्टीकरण आलेली नाही. तसेच श्रेयस तळपदे किंवा या मालिकेतील कोणत्याही कलाकारांनी यावर काहीही प्रतिक्रिया आतापर्यंत दिलेली नाही. हा सर्व प्रकार चुकून झाला की याबद्दलही अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही.