झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे ‘झी मराठी अवॉर्ड्स’. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा पार पडतो. यंदाचाही सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आणि या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेने. अवघ्या तीन महिन्यांत या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली असून सर्वत्र या मालिकेचीच चर्चा पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वोत्कृष्ट सासू, सर्वोत्कृष्ट सून, सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा (स्त्री), सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत, सर्वोत्कृष्ट सासरे, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट आई असे एकूण नऊ पुरस्कार या मालिकेने पटकावले आहेत. त्यातही अभिनेत्री निवेदित सराफ यांना सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत.

‘तुझ्यात जीव रंगला’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकांना टक्कर देत ‘अग्गंबाई सासूबाई’ने स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेमध्ये गिरीश ओक, निवेदिता सराफ, रवी पटवर्धन, तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. यात तेजश्रीने शुभ्रा ही भूमिका साकारली आहे. तर आशुतोष बाबड्या उर्फ ‘सोहम’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे.

‘अग्गंबाई सासूबाई’ला मिळालेले पुरस्कार- 

सर्वोत्कृष्ट सासू- आसावरी
सर्वोत्कृष्ट सून- आसावरी
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा (स्त्री)- मॅडी
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत
सर्वोत्कृष्ट सासरे- आजोबा
सर्वोत्कृष्ट कुटुंब- कुलकर्णी कुटुंब
सर्वोत्कृष्ट मालिका
सर्वोत्कृष्ट जोडी- अभिजीत-आसावरी
सर्वोत्कृष्ट आई- आसावरी

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi awards 2019 aggabai sasubai won maximum awards ssv