झी मराठी वाहिनीवर लवकरच ‘बस बाई बस’ हा नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २९ जुलैपासून हा कार्यक्रम प्रक्षेपित केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे करत आहे. यावेळी सुबोध भावेंनी सुप्रिया सुळेंसोबत संवाद साधला. सध्या याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या कार्यक्रमादरम्यान सुबोध भावेने सुप्रिया सुळेंसोबत एक खेळ खेळला. यावेळी त्यांनी विविध नेत्यांचे फोटो दाखवून त्यांना संभाषण साधण्यास सांगण्यात आले. या खेळादरम्यान सुप्रिया सुळेंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दाखवण्यात आला. यावेळी सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींशी गुजराती भाषेत संवाद साधला. याचा व्हिडीओ झी मराठीने शेअर केला आहे.

Vicky Kaushal Viral Video
Video : विकी कौशलने जिममध्ये अजय-अतुलच्या ‘या’ मराठी गाण्यावर धरला ठेका; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Chhaava
‘छावा’ चित्रपटातील मराठी अभिनेत्याचे ‘त्या’ हटवलेल्या सीनबद्दल वक्तव्य; म्हणाला, “मला खात्री…”
Janhvi Kapoor
‘लवयापा’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी जान्हवी कपूरने पोस्ट केले खुशीबरोबरचे सुंदर फोटो
Marathi actor Sankarshan Karhade meet Sachin Tendulkar
“तू जमिनीवरचा देव दावला…”, सचिन तेंडुलकरच्या भेटीनंतर संकर्षण कऱ्हाडे भारावून गेला; पोस्ट लिहित म्हणाला, “पाच मिनिटं…”
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
Sudha Murty touches Javed Akhtar feet video viral
Video: मंचावर सुधा मूर्ती पडल्या जावेद अख्तर यांच्या पाया; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “संपूर्ण देश त्यांना…”
Komal More
“शत्रूला पोत्यात भरून…”, ‘लाखात एक आमचा दादा’मधील तेजूच्या व्हिडीओवर नेटकऱ्याची कमेंट, अभिनेत्री उत्तर देत म्हणाली…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो पाहताच सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आता घरातही पवार विरुद्ध शिंदे होणार…”

सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींसोबत साधलेला संवाद

“नमस्कार मोदीजी कसे आहात तुम्ही…..

मी गुजरातला जाऊन आले. तिथे सगळं ठिक आहे. गुजरात खूप सुंदर आहे. तिथे मला दर्शनाबेन भेटल्या. त्यांनी मला सुरतला गेल्यावर फाफडाही खायला दिला. मी सुरतलाही गेले होते. तिकडे काही आमदारही होते. ते रेडिसन्स हॉटेलमध्ये थांबलेत याची मला काही माहितीच नव्हती.

अमित शाह पण तिथे होते. ते रोज संसदेत येतात. ते मस्त भाषण करतात. पण तुम्ही संसदेत येत नाहीत. तुम्ही या ना, फार छान वाटेल आम्हा सर्वांना. तुम्ही या आणि माझं भाषण ऐका, मला फार आवडेल. मी गुजराती भाषा बोलायला थोडं थोडं शिकत आहे. मी थोडं गुजराती, थोडं मराठीत बोलते.

गुजरातचे आणि महाराष्ट्राचे संबंध मोरारजी भाईंच्या काळापासून चांगले आहेत. आपली पहिली भेट झाली तेव्हा तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री होता. तेव्हा मी, तुम्ही आणि अनुराग ठाकूर आपण मॅच पाहायला गेलो होतो. तुम्ही या पुन्हा आपण मॅच पाहायला जाऊ, फार मजा येईल. तुम्ही पंतप्रधान आहात, तुमचा वेळ महत्त्वाचा आहे मला कल्पना आहे. चला मी निघते”, असे सुप्रिया सुळे मोदींसोबत संवाद साधताना म्हणाल्या.

बस बाई बस : “मी स्वयंपाक करण्यात कमीपणा…” चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ सल्ल्यावर सुप्रिया सुळेंचं उत्तर

दरम्यान ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. यावर अनेक जण विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहे. या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी फार मजा केल्याचे पाहायला मिळत आहे. सुबोध भावेचा ‘बस बाई बस’हा कार्यक्रम येत्या २९ जुलैपासून प्रक्षेपित होणार आहे. हा कार्यक्रम खास स्त्रियांसाठी असणार आहे. यात सुबोध स्त्रियांसाठी राखीव अशी लेडीज स्पेशल बसचं नेतृत्व करताना दिसणार आहे.

Story img Loader