झी मराठीवरील अनेक मालिका या आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. यापैकी एक मालिका म्हणजे देवमाणूस. या मालिकेच्या पहिल्या पर्वाने १५ ऑगस्टला प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. या मालिकेच्या शेवटच्या भागानंतर अनेकजण फार आतुरतेने दुसऱ्या भाग कधी येणार याची वाट पाहात होते. अखेर प्रेक्षकांची उत्सुकता फार काळ न ताणता अवघ्या पाच महिन्यात देवमाणूस २ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झी मराठीने नुकतंच याबाबतचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत ‘देवमाणूस’मधील डॉ. अजित कुमारचे पुतळा पाहायला मिळत आहे. यानंतर काही सेकेंदात देवमाणूस महाआरंभ एक तासाचा विशेष भाग असे लिहिलेले दिसत आहे. या व्हिडीओला झी मराठीने हटके कॅप्शन दिले आहे.

“जिथे तिथे देवमाणसाचा पुतळा, नक्की भानगड काय ?नवी मालिका ‘देवमाणूस २’ महारंभ होतोय एक तासाच्या विशेष भागाने १९ डिसेंबरला, रविवारी रात्री. ९ वा आणि २० डिसेंबरपासून सोम ते शनि रात्री. १०:३० वा,” अशा आशयाचे खास कॅप्शन देण्यात आले. या कॅप्शनच्या माध्यमातून झी मराठीने देवमाणूस २ या मालिकेला १९ डिसेंबरपासून एक तासाच्या विशेष भागाने सुरुवात होत आहे, असे सांगितले आहे. तर सोमवारी २० डिसेंबरपासून रात्री १०.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा : ‘देवमाणूस’ मालिकेतील कलाकाराने दिली प्रेमाची कबुली, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान या मालिकेचा टीझरवरुन प्रेक्षकांमध्ये या नवीन भागाबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. या मालिकेच्या नवीन पर्वात नेमकं काय बघायला मिळणार याची उत्सुकता अनेकांमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या झी मराठीवर सुरु असलेली ‘ती परत आलीये’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी ‘देवमाणूस २’ मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे. पण या सिझनमध्ये कोणते कलाकार दिसणार हे अद्याप समोर आलेले नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi devmanus 2 serial first episode release date declared nrp