महाराष्ट्रातील तमाम महिलांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे नाव घेतले जाते. गेल्या १८ वर्षांपासून अधिक काळ या कार्यक्रमाद्वारे तमाम वहिनींचा सत्कार आणि सन्मान केला आहे. झी मराठीवर होममिनिस्टर या कार्यक्रमाच्या महामिनिस्टर या नवीन पर्वाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या नवीन पर्वातील विजेत्या वहिनीला चक्क ११ लाखांची पैठणी भेट म्हणून मिळणार आहे. या कार्यक्रमाची आणि आदेश बांदेकर यांची लोकप्रियता अफाट आहे. नुकतंच आदेश बांदेकर यांनी एका प्रसारमाध्यमाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी १८ वर्षांत घडलेले अनेक किस्से सांगितले.
महामिनिस्टर या कार्यक्रमाच्या निमित्ताने नुकतंच त्यांनी बीबीसी मराठीला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, या कार्यक्रमाची जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा तो फक्त १३ एपिसोडचा होता. मात्र त्याचा फॉरमॅट प्रेक्षकांना इतका आवडला की त्याचं रुपांतर आज इतक्या प्रचंड प्रमाणात झालं आहे. यात त्यांनी होम मिनिस्टरमध्ये गेल्या १८ वर्षात झालेले किस्से शेअर केले आहे.
“ती ११ लाखांची पैठणी मी देणार नाही…”, आदेश बांदेकरांनी ट्रोलर्सला सुनावले खडे बोल
होम मिनिस्टरमुळे मी ज्या कुटुंबात जायचो, त्या घरातील सदस्यांना मी त्यांच्यातील एक वाटायचो. आम्ही आजवर कधीच कोणत्याही कुटुंबात भेदभाव केला नाही. एकदा एका एपिसोडसाठी आम्ही फार लहान घरात गेलो होतो. त्याठिकाणी साधी खुर्चीही बसण्यासाठी नव्हती. त्यावेळी मी गॅसच्या सिलेंडवर बसून तो एपिसोड शूट केला. त्यावेळी त्या माऊलीने फार प्रेमाने मला घरातली एक चादर त्यावर बसण्यासाठी आणून दिली होती आणि त्यावेळी मला तेवढेही पुरसे होते.
आतापर्यंत अनेक कुटुंबांशी माझा नकळत जोडलो गेलो. त्यावेळी ते सगळे मला कोणीतरी घरचा सदस्य असल्यासारखेच मानत होते. ही कुटुंब त्यांच्या घरचा सदस्य समजतात हेच माझं भाग्य आहे. या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम इथपर्यंत आला आहे.
आणखी वाचा – “दादा आले” म्हणताच भावोजींनी काढला होता पळ, जाणून घ्या सुचित्रा आणि आदेश बांदेकरांची हटके लव्हस्टोरी
दरम्यान गेल्या १८ वर्षांपासून होम मिनिस्टर हा लोकप्रिय कार्यक्रम प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आला आहे. होम मिनिस्टरमधील नवीन पर्वाच्या विजेतीला ११ लाखांची पैठणी मिळणार आहे. सोन्याची जर आणि हिरे जडलेल्या या पैठणीची चर्चा सगळीकडे सुरु आहे. या निमित्ताने आदेश बांदेकर हे महाराष्ट्रातील विविध शहरात फिरताना दिसत आहेत.