छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेकडे पाहिलं जाते. सध्या ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेत इंद्रा आणि दिपूची हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत विशेष ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या या मालिकेत दिपूचा अपघात झाला असून ती रुग्णालयात दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. पण आता दिपूची प्रकृती सुधारावी यासाठी इंद्रा हा अग्निपरीक्षा देणार आहे.

झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. इंद्रा आणि दिपू ही जोडी प्रेक्षकांची आवडती ठरत आहे. सध्या या मालिकेत प्रेक्षकांना दिपूचा अपघात आणि रुग्णालयातील दृश्य पाहायला मिळत आहे. सानिकाने दिपूला ढकलल्यामुळे तिचा गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या प्रकृतीत काहीही सुधारणा होत असल्याचे दिसत आहे.

“मी मालिका सोडलेली नाही…”, ‘मन उडू उडू झालं’ मालिका सोडण्यावर हृता दुर्गुळेचे स्पष्टीकरण

तिच्या या अवस्थेमुळे देशपांडे कुटुंबीय आणि इंद्रा खूप जास्त टेन्शनमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर दिपूची प्रकृती सुधारावी यासाठी इंद्रा हा अग्निपरीक्षा देणार आहे. येत्या रविवारी प्रसारित होणाऱ्या विशेष भागामध्ये प्रेक्षकांना दिपूची प्रकृती खूप खालावणार आहे. डॉक्टर देशपांडे कुटुंबियांना दिपूला काहीही होऊ शकतं असं म्हणतात. हे ऐकून इंद्राच्या पायाखालची जमीन सरकते.

“…म्हणूनच बाप झाल्यापासून तू वेड्यासारखा वागतोय”, मिनाक्षी राठोडने पतीसाठी केलेली पोस्ट चर्चेत

त्यामुळे दिपूला सुखरूप परत मिळवण्यासाठी इंद्रा अग्निपरीक्षा द्यायचं ठरवतो. या अग्निपरीक्षेत त्याच्या मार्गात खूप अडथळे येतात. पण इंद्रा अडथळ्यांवर मात करू शकेल का ? इंद्राच्या अग्निपरीक्षेमुळे दिपूचे प्राण वाचणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना येत्या भागात पाहायला मिळणार आहेत.

Story img Loader