झी मराठीवरील ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ८ नोव्हेंबरपासून या मालिकेच्या जागी आता ‘हम तो तेरे आशिक है’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. झी मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. या प्रोमोमध्ये पुष्कर श्रोत्रीचा आवाज ऐकू येत असून तो या मालिकेत नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार याची उत्सुकता आता त्याच्या चाहत्यांना लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, देशपांडे कुटुंबियांची लाडकी नुपूर अर्थात नकटूचे लग्न ठरवण्यासाठी तिच्या घरातले घेत असलेली मेहनत या मालिकेत दाखवण्यात आली आहे. नकटूचे लग्न ठरवताना आलेली अनेक मुलं आणि त्यातल्या अडचणी तसेच त्यातून उडालेली धमाल हे सर्व या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. विनोदी धाटणीची ही मालिका जेवढ्या उत्साहाने सुरू करण्यात आलेली तेवढा चांगला प्रतिसाद प्रेक्षकांकडून मात्र मिळाला नाही.

मराठी सिनेसृष्टीतील अनेक नावाजलेल्या अभिनेत्यांनी या मालिकेत नकटीचा नवरा होण्यासाठी म्हणून घरात एण्ट्री घेतली होती. प्रसिद्ध कलाकारांची मांदीयाळी असलेली ही मालिका, तरीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली नाही. त्यामुळे वाहिनेने आता या मालिकेच्या बदली ‘हम तो तेरे आशिक है’ ही नवी मालिका आणण्याचा निर्णय घेतला. बुधवार ते शुक्रवार रात्री १० वाजता प्रसारित होणारी ही मालिका प्रेक्षकांचे किती मनोरंजन करते हे तर काही दिवसांत कळेलचय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi new serial hum to tere aashiq hain and serial nakatichya lagnala yaych ha will off air off soon