झी मराठीवरील एकत्र कुटुंब पद्धतीचं दर्शन घडवणारी ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अदिती म्हणजेच अभिनेत्री अमृता पवार विवाहबंधनात अडकली आहे. अमृताने नील पाटीलसोबत लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तिच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अमृताने तिच्या लग्नात नीलसाठी खास उखाणाही घेतला. सध्या तिच्या या उखाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमृता आणि नीलचा विवाहसोहळा बुधवारी पार पडला. तिने तिच्या विवाहसोहळ्याचे काही निवडक क्षण व्हिडीओद्वारे चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. या व्हिडीओत तिच्या हळदीपासून लग्नापर्यंतची धामधूम पाहायला मिळत आहे. अमृताने मित्र मैत्रिणी आणि नातेवाईंकाच्या उपस्थितीत नील पाटील याच्याशी लगीनगाठ बांधली. मोठ्या थाटामाटात त्या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. यावेळी अमृताने छान उखाणाही घेतला.

‘एक पाऊल पुढे…’, ‘तुझ्या माझ्या संसाराला…’ फेम अमृता पवारच्या विवाहसोहळ्याचे खास फोटो

या उखाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात उखाणा घेताना ती म्हणते, ‘पाटलांच्या घरात प्रवेश करुन करणार नवीन संसाराची सुरुवात, नील रावांचं नाव घेते ठेवाल ना मला सुखात?’ अमृताच्या या गोड उखाण्यानंतर सर्व उपस्थित व्यक्तींनी तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या. तसेच तिचे कौतुकही केले. या उखाण्यानंतर अमृता आणि नील हे दोघेही एकमेकांकडे बघून गोड हसत होते.

‘तुझ्या माझ्या संसाराला…’ फेम अमृता पवार अडकली विवाहबंधनात, लग्नाचा व्हिडीओ पाहिलात का?

दरम्यान अमृता आणि नीलचा साखरपुडा एप्रिल महिन्यात पार पडला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा हळदी सभारंभ पार पडल्याचे पाहायला मिळत होते. यात ते दोघेही हळदीच्या रंगात रंगल्याचे पाहायला मिळाले.

पाहा व्हिडीओ –

अमृताने सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ आणि ‘जिगरबाज’ या मालिकेत काम केले होते. पण ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi serial tuzya mazya sansarala ani kay hav fame actress amruta pawar marraige ukhana video viral nrp