‘झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या ‘बस बाई बस’च्या पुढील भागामध्ये हजेरी लावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – “दोन मंत्र्यांच्या बायकांचं एकमेकींशी जमतं का?” प्रश्नावर अमृता फडणवीसांचं भन्नाट उत्तर

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पती देवेंद्र फडणवीस तसेच आपल्या खासगी आयुष्याबाबत खुलेपणाने सांगितलं. या कार्यक्रमामध्ये प्रत्येक प्रश्नाला अमृता या स्पष्टपणे उत्तर देताना दिसल्या. यावेळी अमृता यांच्याबरोबर एक खेळ खेळण्यात आल्या. त्यांना काही पुणेरी पाट्या दाखवण्यात आल्या. शिवाय या पाट्या कोणाच्या घराबाहेर शोभून दिसतील हे अमृता यांना सांगायचं होतं.

“आमच्या येथे गुवाहाटीला जायला मोफत बस मिळेल” ही पाटी अमृता यांना दाखवण्यात आली. ही पाटी पाहिल्यानंतर त्या म्हणाल्या, “एकनाथजी शिंदे गुवाहाटीला जाऊन आलेले आहेत. कोण कुठे जातं येतं याची पूर्ण कल्पना त्यांना असते. त्यामुळे ही पाटी आपण एकनाथजी शिंदे यांच्या घराबाहेर लावू शकतो.”

आणखी वाचा – सुष्मिता सेनचा ‘तो’ व्हिडीओ पाहून ललित मोदींना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले, “तू हॉट…”

अमृता यांचं उत्तर ऐकून सुबोध भावे हसत म्हणतो, “पुण्यात तयार झालेली पाटी आता ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर लावायला हरकत नाही.” तसेच अमृता यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. या कार्यक्रमामध्ये अमृता यांना एक गाणं गाण्यास सांगण्यात आलं. अमृता यांचं गाणं ऐकण्यामध्ये यावेळी सारे जण मग्न झाले होते.