‘झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या ‘बस बाई बस’च्या पुढील भागामध्ये हजेरी लावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ गाणं ऐकताच कोणाचा चेहरा समोर येतो? अमृता फडणवीस म्हणाल्या “उद्धवजी…”

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पती देवेंद्र फडणवीस तसेच आपल्या खासगी आयुष्याबाबत खुलेपणाने सांगितलं. या कार्यक्रमामध्ये प्रत्येक प्रश्नाला अमृता या स्पष्टपणे उत्तर देताना दिसल्या. नेते मंडळी म्हटलं की कधी ना कधी या मंडळींच्या पत्नी एकत्र भेटतच असणार असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात नक्कीच असतो.

असाच एक प्रश्न अमृता यांना या कार्यक्रमामध्ये विचारण्यात आला. दोन मंत्र्यांच्या बायकांचं एकत्र जमतं का? असा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी यावर हटके उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “कोणताही मंत्री असो त्यांच्या पत्नीला घराबाहेर पडायला तेवढा वेळच मिळत नाही. सतत घरात काही ना काही कामं असतात. पण एक सांगते की, दोन मंत्री यांच्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. मात्र दोन मंत्र्यांच्या बायकांचं एकमेकांशी जमतं.”

आणखी वाचा – Video : “माझा मुलगा चार पावलं…” लेकाची करामत अन् बायकोचा राग, कुशल बद्रिकेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

अमृता यांच्या या उत्तरानंतर मंचावर उपस्थित कार्यक्रमामधील मंडळींच्या चेहऱ्यावरही हसू आलं. तसेच त्यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. या कार्यक्रमामध्ये अमृता यांना एक गाणं गाण्यास सांगण्यात आलं. अमृता यांचं गाणं ऐकण्यामध्ये यावेळी सारे जण मग्न झाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi show bus bai bus amruta fadnavis talking about relationship between two minister and his wife see details kmd