अभिनेत्री रिंकू राजगुरुने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ‘सैराट’ चित्रपटानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. मराठी चित्रपटांपुरताच ती मर्यादित राहिली नाही. हिंदी वेबसीरिजमध्येही तिने काम केलं. आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी ती अधिकाधिक मेहनत घेताना दिसते. अगदी कमी वयामध्ये प्रसिद्धी मिळवलेल्या रिंकूने झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने आपल्या कामाबाबत तसेच खासगी आयुष्यामधील काही प्रसंगांबाबत खुलेपणाने सांगितलं.

‘सैराट’मध्ये रिंकूने अगदी कमी वयामध्ये ट्रॅक्टर चालवला होता. तिची ही धाडसी वृत्ती आणि काम करण्याची जिद्द सगळ्यांनाच आवडली. खऱ्या आयुष्यातही रिंकू स्वतः गाडी चालवते. पण गाडी चालवत असताना तिला एका प्रसंगाला सामोर जावं लागलं. याबाबतच तिने ‘बस बाई बस’ कार्यक्रमामध्ये सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ

कार्यक्रमाचा सुत्रसंचालक सुबोध भावेने तिला विचारलं की, गाडी कोणाच्या अंगावर घातलीस तू? यावर ती म्हणाली, “एका सेटवर काम करत असताना मला थोडा वेळ मिळाला. म्हणून मिळालेल्या वेळेमध्ये मी गाडी चालवते असं म्हटलं. आमच्याकडे मेकिंगसाठी ललित खाचरे म्हणून मुलगा होता. तो मुलगा प्रचंड उत्साही. गाडी चालवताना मेकिंग करायला मध्येच कोणी येतं का? मी गाडी चालवत होते आणि तो अगदी समोर आला. त्यामध्ये माझी काय चुकी. मग ब्रेक कसा मारणार? त्याच्या पायावरून माझ्या गाडीचं चाक गेलं. त्याला फार लागलं नाही. पण असं आडवं कोण येतं का? आत्महत्या करताना माणसं चारवेळा पुढे-मागे बघतात गाडी येत आहे की नाही…”

आणखी वाचा – लग्नानंतरही सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर सनी देओलचं सुरु होतं अफेअर, पत्नीला सत्य समजलं अन्…

रिंकूने हा किस्सा सांगताच मंचावर उपस्थित असणारी मंडळीही हसू लागली. त्याचबरोबर तिने आपल्या करिअर तसेच चित्रपटांबाबतही दिलखुलास गप्पा मारल्या. पण तिने सांगितलेला हा किस्सा व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Story img Loader