सुप्रसिद्ध गायक सोनू निगमवर झी कंपनीने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी आपच्या रॅलीत गजेंद्र सिंह नावाच्या शेतकऱयाने आत्महत्या केली होती. त्यावर आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी ‘लटक गया’ अशी प्रतिक्रिया दिली होती. सोनू निगमने कुमार विश्वास यांच्या प्रतिक्रियेचा हा व्हिडिओ रिट्वीट करत राजकारणाशी माझा फारसा संबंध नाही, मात्र माझे कवीमित्र कुमार विश्वास यांच्याविषयी पसरवण्यात आलेल्या व्हिडिओबाबत सत्य बाहेर यावे, इतकीच माझी इच्छा आहे, असे म्हटले होते. या प्रकऱणी सोनू निगम यांच्या गाण्यांशी संबंधित कोणतेही संगिताचे हक्क यापुढे विकत न घेण्याचा निर्णय झी मीडियाने घेतला आहे. हे प्रकरण सोशल मीडियामार्फत सोनू निगमच्या चाहत्यांपर्यंत जाताच त्यांनी सोनू निगमच्या ट्विटवर रिट्विट करत त्यांना पाठिंबा दिला आहे.

Story img Loader