डॉ. आनंदीबाई जोशी हे नाव आजही मोठ्या आदरानं महाराष्ट्रातच नाही तर जगभरात घेतलं जातं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून आनंदीबाई शिकल्या, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यांच्या प्रेरणादायी जीवनसंघर्षावर आधारित ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आनंदीबाई म्हणजे महाराष्ट्रानं देशातल्या प्रत्येक महिलेला दिलेली देगणी आहे असं म्हणत झी स्टुडिओनं या चित्रपटाची घोषणा केली आहे. १५ फेब्रुवारीला आनंदीबाईचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वयाच्या केवळ अठराव्या वर्षी बोटीनं परदेशी जाणारी पहिली स्त्री, हालअपेष्टा सहन करीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारी पहिली स्त्री. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करीत हाती घेतलेले जीवित कार्य जिद्दीने पूर्ण करणारी स्त्री म्हणून त्या आजही ओळखल्या जातात. श्री. ज. जोशी यांनी ‘आनंदी गोपाळ’ यांच्यावर कादंबरी लिहिली होती. या कादंबरीवर आधारित नाटकही रंगभूमीवर आलं होतं.

वयाच्या दहाव्या वर्षी आनंदीबाईचं लग्न गोपाळराव जोशी यांच्याशी झालं. मी आनंदीबाईंना माझ्या मनाप्रमाणे शिकवेन अशी अट गोपाळरावांनी आनंदीबाईच्या वडिलांना घातली होती. आनंदीबाईच्या शिक्षणात आजींचा अडसर नको म्हणून गोपाळरावांनी कोल्हापूरमध्ये बदली करून घेतली. कोल्हापूरमध्ये मिशनऱ्यांशी ओळख वाढल्यावर तिथे प्रथम गोपाळरावांच्या मनात आलं की आनंदीला अमेरिकेला पाठवून तिचं शिक्षण करावं. मात्र शिकण्याच्या कार्यात झोकून देताना खूप अपमानास्पद शेरे त्यांना ऐकावे लागतं. परंतु तिकडे दुर्लक्ष करून आनंदी आपला अभ्यास निष्ठेने करीत राहिला.

त्यांचा हाच प्रवास ‘आनंदी गोपाळ’ मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात आनंदीबाईंची भूमिका साकारणार कोण याचीच उत्सुकता आता सर्वांना लागून आहे.