शाहरुखचा बहुप्रतिक्षित ठरत असलेल्या ‘झीरो’ या चित्रपटाचा काही दिवसापूर्वी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. शाहरुखच्या वाढदिवशी प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट नक्की कसा असेल याविषयी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. यामध्येच झीरोचा आणखी एक नवा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ईदच्या मुहूर्तावर शाहरुखने आपल्या चाहत्यांना ही नवी भेट दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गत जून महिन्यात ईदच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर ईदच्याच दिवशी नवा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला. हा नवा ट्रेलर शाहरुखने ट्विटरवर शेअर केला असून ‘बऊआ सिंह की ये झलक जरा संभलकर देखना, कहीं देखते देखते प्यार ना हो जाये,’ असं या ट्रेलरमध्ये सांगण्यात आलं आहे.

आनंद एल राय दिग्दर्शित ‘झीरो’ या चित्रपटात शाहरुखने एका कमी उंचीच्या व्यक्तिच्या भूमिका साकारली असून त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून येणार आहेत. दरम्यान, ईदच्या दिवशी ‘झीरो’चे पहिले गाणे रिलीज होणार, अशी चर्चा होती. मात्र हे गाणं आता २१ नोव्हेंबरऐवजी २३ नोव्हेंबरला येणार असल्याचं शाहरुखने सांगितलं आहे. इतकंच नाही तर चाहत्यांचा हिरमोड होऊ नये यासाठी शाहरुखने हा शानदार व्हिडिओ शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zero new trailer shahrukh khan shares new promo video zero
Show comments