बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा.’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटात हृतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, कतरिना कैफ, कल्कि कोचलिन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन १० वर्षे झाली आहेत. त्या निमित्ताने जाणून घेऊया चित्रपटातील एक मजेशीर किस्सा…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटाची निर्माती जोया अख्तरने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत चित्रपटातील काही सीन दाखवण्यात आले आहेत. या सीनमध्ये हृतिक, फरहान आणि अभय बार्सिलोना ते कोस्टा ब्रावा प्रवास करत असतात. हृतिक गाडी चालवत असतो. दरम्यान हृतिकला ऑफिसमधून एक फोन येतो. फोनवर बोलण्यासाठी तो गाडी घाटात रस्त्याच्या बाजूला लावतो आणि गाडीतून खाली उतरतो. पण हृतिक गाडीतून उतरताना गाडीचा हँड ब्रेक लावायला विसरतो. हृतिक खाली उतरताच गाडी पुढे सरकते. फरहान गाडीतून उडी मारतो आणि गाडीत बसलेला अभय घाबरतो. पण हृतिक पटकन येऊन गाडी बंद करतो.

आणखी वाचा : ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सीक्वेल येणार प्रेक्षकांच्या भेटीला? हृतिकने केला खुलासा

व्हिडीओमध्ये अभय बोलता की, ‘हृतिकमुळे मी आणि फरहान मरणारच होतो. फरहान खूप फास्ट आहे. तो गाडी पुढे सरकत आहे हे पाहून तातडीने उडी मारतो आणि मी मरणार हाच विचार करत बसलो होतो.’

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाचे जोया अख्तरने दिग्दर्शन केले आहे. तसेच चित्रपटाला म्यूझिक शंकर एहसान लॉयने दिले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zindagi na milegi dobara turns 10 avb