शाहरुख खान एखाद्या ठिकाणी असणे आणि लोकांच्या नजरा त्याच्याकडे जाणार नाही असे होणे शक्यच नाही. पण प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो असेही म्हटले जाते. याचाच अनुभव शाहरुखनेही घेतला. डिअर जिंदगीची दिग्दर्शिका गौरी शिंदे आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी मात्र हे अशक्यही शक्य करुन दाखवले आहे. त्या दोघीसमोर असताना शाहरुखकडे कोणी पाहिलेच नाही, आणि यावर सर्वात जास्त खुष कोण होता माहित आहे का? खुद्द शाहरुखच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘डिअर जिंदगी’ या सिनेमाचे प्रदर्शन काही दिवसांवरच आले असताना इंडियनएक्सप्रेस डॉट कॉमने त्यांची एक विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत गौरी आणि आलिया यांनी स्पष्ट उत्तर दिली. पण शाहरुखची उत्तरांनी मात्र मने जिंकली. शाहरुखला अशा जगात राहायचे आहे, जिथे फक्त महिलाच असतील. ‘खरं सांगायचं तर हे मुलींचे जग आहे आणि मला असे जग फार आवडते. त्यांच्याबद्दल लिहिताना, त्यांच्याशी बोलताना किंवा मुलाखत देताना त्यांच्यामध्ये असणारी संवेदनशीलता मला फार आवडते. जीवनाकडे बघण्याच्या वेगळा दृष्टीकोन ते देतात. जे सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. त्यांना महिलांच्या समानतेसाठी झगडण्याची काहीच गरज नाही. एक उत्तम संदेश देणाऱ्या सिनेमाचे मला प्रतिनिधित्व करायला मिळत असेल तर मी कोणत्याही महिलेसोबत काम करु शकतो. माझ्यासाठी ती खूप अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या आजूबाजूला अशा प्रतिभावान महिला असाव्यात असंच मला नेहमी वाटतं. पण हे चांगल्या अर्थाने…’

मग तो बोलतच राहिला, शाहरुख म्हणाला की, ‘सिनेसृष्टीत एक कलाकार म्हणून तुम्ही संवेदनशील असणे फार महत्त्वाचे आहे. पुरुषांपेक्षा महिला या फार संवेदनशील असतात.’

असे असेल तर या सिनेमाच्या चित्रिकरणामध्ये सगळ्यात जास्त रिलॅक्स तुच असशील, कारण या सिनेमाचे दिग्दर्शन गौरी शिंदेने केले आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना किंग खान म्हणाला की, ‘हो मी एवढा रिलॅक्स व्हायचो की, मी कधी कधी झोपूनच जायचो.’

जेव्हा आलियाला प्रश्न विचारले जात होते, तेव्हा शाहरुख तिच्याकडे खट्याळ नजरेने पाहत होता. तर आलियाही तेवढ्याच उत्साहाने उत्तरे देत होती. तिने याआधीही अनेकदा सांगितले की, शाहरुखसोबत एखादा रोमॅण्टीक सिनेमा करायला आवडेल, तेव्हा ती म्हणाली की, ‘मी खूपच उत्साही आहे. शाहरुख ही माझ्या आयुष्यातली अशी व्यक्ती आहे, ज्याला मी लहानपणापासून बघत आले आहे आणि त्याची फार आधीपासूनच प्रशंसक आहे.’

”डिअर जिंदगी’ या सिनेमातले गो टू हेल हे गाणे सध्या प्रत्येक तरुण- तरुणींच्या ओठावर आहे. प्रेमभंगातून बाहेर पडण्यासाठी तिही अशाच प्रकारे काही करते का? असे विचारले असता ती म्हणाली की, मी नेहमीच नकारात्मक भावनांपासून लांब राहते. पण, या गाण्याबद्दल बोलायचे झाले तर अशा भावनांचा कसा सामना करायचा याचे काही पक्के असे नियम नाहीत. आपल्याला दुःख लगेच होते, आपल्या भावना लगेच दुखावल्या जातात आणि आपल्याला या सर्व गोष्टी अजिबात नको असतात.’