२०१९ मध्ये प्रदर्शित झालेला, जोया अख्तर आणि रीमा कागतीद्वारे लिखित ‘गली बॉय’ने केवळ बॉक्स ऑफिसवरचेच सगळे रिकॉर्ड तोडले नाहीत तर प्रेक्षकांची मने देखील जिंकली आहेत. चित्रपटाने हिंदी हिप-हॉप संगीताचा मार्ग प्रशस्त करत अनेक अंडरग्राउंड कलाकारांना लाईम लाइटमध्ये आणले.
आज, जोया अख्तर, रीमा कागती यांच्या ‘टाइगर बेबी फिल्म्स’ने सोशल मीडियावर ‘द गली ग्रोव चैलेंज’ची सुरुवात केली आहे. यामध्ये दर्शकांना स्वत:ला सादर करण्याची संधी मिळणार आहे. त्यांनी चित्रपटातील सुपरहिट गाणं ‘अपना टाइम आएगा’वर ३० सेकंदांचा रील व्हिडीओ बनवून सादर करायचा आहे. यामध्ये आपल्या कल्पनाशक्तीला चालना देत ते रॅपिंग, डांस, रनिंग, ड्राइविंग, कुकिंग या कशावरही त्यांना हा रील व्हिडीओ तयार करता येईल.
View this post on Instagram
याविषयी बोलताना जोया म्हणाल्या, “सोशल मीडियाची ताकद अभूतपूर्व आहे. यामुळे मी वैयक्तिक रूपाने जोडले गेले आहे आणि मला आशा आहे की आता या रीलमुळे मी तुमच्याशी जोडू शकेल. गली ग्रूव चैलेंजसोबत संगीत आणि व्यक्तिमत्व सादर होणार आहे, तेव्हा तुम्ही काय सादर करणार आहात हे पाहण्याची मला प्रचंड उत्सुकता आहे.”
आणखी वाचा : फरहान अख्तरच्या ‘तुफान’चा ट्रेलर प्रदर्शित
लिमिटेड एडिशन गली बॉय व्हीनाईल, ज्यावर जोया अख्तर आणि रीमा कागती यांच्या स्वाक्षऱ्या असलेला मॅसेज असेल, हे टॉप १० रील्सना देण्यात येईल!
आणखी वाचा : ‘माझ्या आयुष्यात कंगनाला महत्व नाही’, तापसीने दिलं कंगनाला सडेतोड उत्तर
जोया अख्तरने रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्या गली बॉयचे दिग्दर्शन केले होते. चित्रपटाला ब्युशीयन इंटरनेशनल फॅन्टास्टिक फिल्म फेस्टिवल (BIFAN) मध्ये सर्वश्रेष्ठ आशियाई चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. २०१९ मध्ये NETPAC सर्वश्रेष्ठ आशियाई चित्रपट आणि अशाच काही अन्य पुरस्कारांनी देखील सम्मानित करण्यात आले होते.