पुण्यात एका रस्त्याचे नूतनीकरण झाले आणि त्याला एका बड्या नेत्याचे नाव देण्यात आले.
पावसाळा आला आणि पहिल्याच पावसात रस्त्याची वाट लागली.
एका पुणेकराने रस्त्याच्या नावाच्या पाटीवर लिहून ठेवले-
“..यापेक्षा रस्त्याला कंत्राटदाराचे नाव दिले असते आणि त्याबरोबर फोन नंबरही दिला असता तर रस्ता आपसूक टिकाऊ झाला असता (!)”