मन्या : एकदा मला बायकोनं विचारलं,
“मी जर तुम्हाला तीन-चार दिवस दिसले नाही, तर तुम्हाला कसं वाटेल?”
जन्या : मग तू काय बोललास?
मन्या : मी तिला म्हंटलं, “मला आनंद होईल.”
जन्या : मग काय झालं?
मन्या : मग काय…
बोयको मला सोमवारी दिसली नाही.
मंगळवारी दिसली नाही.
बुधवारी दिसली नाही.
पूर्ण आठवडाभर दिसली नाही.
मग जशीजशी माझ्या डोळ्याची सूज कमी होऊ लागली,
तशीतशी ती मला दिसायला लागली.