मन्या, जन्या आणि सोन्या पिकनिकला जातात.
तिकडे गेल्यावर त्यांच्या लक्षात येतं की, कोल्ड्रिंक घरीच राहिलं.
ते ठरवतात की, सोन्या जाऊन कोल्ड्रिंक घेऊन येईल.
सोन्या म्हणतो, “एका अटीवर जाईन. मी परत येईपर्यंत तुम्ही समोसे खायचे नाही.”
मन्या आणि जन्या मान्य करतात.
दोन दिवस होतात तरी सोन्या परत येत नाही.
मन्या आणि जन्या समोसे खायचं ठरवतात.
ते समोसा तोंडात टाकणार, इतक्यात…
सोन्या झाडामागून येतो आणि म्हणतो,
“असं कराल तर मी जाणार नाही.”