(मन्या त्याच्या ड्रायफ्रु़टच्या दुकानात बसलेला असतो.)
(तिकडून जन्या येतो आणि विचारतो.)
जन्या : बदाम खाल्ल्यानं काय होतं?
मन्या : बदाम खाल्ल्यानं बुद्धी तेज होते.
जन्या : खरंच बुद्धी तेज होते?
मन्या : मला सांग एक किलो तांदुळात किती तांदुळाचे दाणे असताता?
जन्या : माहीत नाही.
मन्या : हे बदाम खाऊन बघ.
मन्या : आता मला सांग एका डझनात किती केळी असतात?
जन्या : बारा.
मन्या : बघितलंस बुद्धी तेज झाली की नाही?