जन्या : का रे तू सकाळी फिरायला का जात नाहीस?
मन्या : जे दररोज सकाळी फिरायला जातात त्याला
‘मॉर्निंग वॉक’ म्हणतात.
जे डॉक्टरांनी सांगितल्यावर फिरायला जातात, त्याला…
‘वॉर्निंग वॉक’ म्हणतात.
जे दररोज बायकोबरोबर फिरायला जातात, त्याला…
‘डार्लिंग वॉक’ म्हणतात.
जे दुसरे फिरायला गेल्यावर जळतात, म्हणून हेही फिरायला जातात, त्याला…
‘बर्निंग वॉक’ म्हणतात.
जे बायकोबरोबर फिरायला जातात, पण वळून दुसऱ्या महिलेकडे बघतात, त्याला…
‘टर्निंग वॉक’ म्हणतात.
मन्याचं उत्तर ऐकून जन्याला चक्कर येते.