रात्रीच्या वेळी वेड्यांच्या हॉस्पिटलमधून पळालेले चार वेडे
रस्त्यावर चाललेल्या काकांवर हल्ला करण्यासाठी त्यांना घेरतात.
तेवढ्यात काका त्यांना म्हणतात,
“तुम्ही चार आणि मी एकटा हे बरोबर नाही.”
चार वेड्यांमधला एक वेडा दोघांना काकांच्या बाजूने जायला सांगतो.
काका म्हणतात, “आता आम्ही तिघं आणि तुम्ही दोघंच आहात.”
तेवढ्यात काकांच्या टीमधला एक वेडा काकांना म्हणतो,
“काका! काही हरकत नाही, तुम्ही घरी जा. आम्ही या दोघांना निपटतो.”