पुणेकरांचे हजरजबाबी बोलणे आणि कृती प्रसिद्धच आहे आणि त्याची चुणूक ते संधी मिळेल तिथे दाखवत असतात.
एकदा दोन पुणेकर मुंबईमधील एका हॉटेलमध्ये गेले आणि दोघात एका चहाची ऑर्डर दिली.
चहा येईपर्यंत आपापल्या पिशवीतून त्यांनी डबे काढले. वेटरने नम्रपणे येऊन सांगितले, “माफ करा. पण तुम्ही इथे आपले डबे खाऊ शकत नाही.”
दोघा पुणेकरांनी एकमेकांकडे क्षणभर पाहिले आणि तत्काळ डब्यांची अदलाबदली केली.