पुणेकरांना खवचट म्हणून लोक उगाचच नावे ठेवतात. काही वेळा पुणेकर निरागसपणे असे काही बोलून जातात की ज्याचे नाव ते ! आता हेच पहा ना-
मध्य पुण्यातील एका हॉटेलमध्ये लिहिलेली पाटी रस्त्यावरून जाणाऱ्या एका काकूंनी वाचली.
‘येथे बालकामगार काम करत नाहीत.’
काकू (गल्ल्यावरच्या मालकाला, आपुलकीने)- “मी सांगून बघू का त्यांना ? माझं नक्की ऐकतील ते… (!)”