रेल्वेत टीसी आलेला पाहून जोशी काका उभे राहिले आणि आपले तिकीट शोधू लागले. शर्ट, पँट आणि अगदी बनियनचेही खिसे तपासून झाले.
डब्यात बसलेल्या सहप्रवाशाने विचारले, “काय शोधताय..?”
जोशी काका- “तिकीट!”
सहप्रवासी- (हसून) अहो, मग तुमच्या तोंडात काय आहे?
जोशी काका- “अरेच्चा, हो की!”
अर्धवट भिजलेलं ते तिकीट कसेबसे तपासून टीसी गेला.
त्यानंतर सहप्रवाशाने जोशी काकांच्या विसरभोळेपणाची टिंगल उडवण्यास सुरुवात केली.
जोशी काकू त्याला मूर्खात काढत म्हणाले, “ते तिकीट कालचं होतं. आजचं तिकीट सापडत नाहीसं पाहून मी मुद्दाम कालचं तिकीट तोंडात धरून त्यावरची तारीख उडवली होती!”
आणखी वाचा