एका बागेबाहेर लावण्यात आलेली पाटी (स्थळ अर्थातच पुणे)
– सर्वांनी तिकीट काढूनच आत येणे बंधनकारक आहे. चिंधीगिरी नको.
– तिकीट शुल्क चुकवण्यासाठी ‘नेहमीच येतो’, ‘भाऊंनी पाठवलंय’ वगैरे कारणे येथे चालणार नाहीत.
– कोणत्याही झाडाला विनाकारण आणि कारण काढूनही स्पर्श करू नये.
– झाडांच्या बुंध्यावर ‘लव्ह यू’ वगैरे फाजील मजकूर लिहिलेला खपवून घेतला जाणार नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या गोष्टी टिपल्या जात आहेत हे लक्षात घ्या.
– प्रिय व्यक्तीस ‘मी तुला खरंच आवडते/आवडतो का?,’ वगैरे लाडिक प्रश्न विचारताना गवत उपटण्याची गरज नाही. ते पुन्हा वाढायला वेळ लागतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

 

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi jokes on punekar