एक आजोबा रस्त्यावरून चालत घरी निघाले होते. चालता चालता त्यांचे लक्ष सहज आकाशाकडे गेले..
आजूबाजूला लक्ष नसल्यामुळे ते नेमके एका काकूंच्या दुचाकीसमोर येता येता वाचले.
काकू- “(गाडी थांबवून शांतपणे) आजोबा, जिकडे चालला आहात तिकडेच बघा.. नाहीतर जिकडे बघताय तिकडे जाल!”