पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रथमच गेलेल्या एका पुणेकराने चहा मागवला. वेटरने गरम पाणी, टी बॅग, साखर, दूध असे समोर आणून ठेवले. पुणेकर कसाबसा चहा प्यायला.
वेटरने विचारले, “अजून काही घेणार का ?”
पुणेकर- “राहू दे बाबा. भजी खाणार होतो. पण तू कांदे, बेसन, कढई आणि तेल आणून देशील.”