”हाय मनाली, आज फ्री आहेस का? भेटायचं आहे तुला. एक महत्त्वाचं काम आहे. प्लीज प्लीज नाही म्हणू नकोस”
”ओके, कुठे आणि कधी भेटू ते सांग”
ठरलेल्या वेळात मनाली तिथे पोहचली. तिथे केदार उभा होता. त्याच्या हातात रंगीबेरंगी पाच सहा पिशव्या होत्या. पांढरा शर्ट निळी जीन्स घालून केदार तिचीच वाट बघत होता.
”हाय”
”हाय, छान दिसतोय या शर्टमध्ये” केदार लाजला. पहिल्यांदाच त्याला मनालीने कॉम्प्लिमेंट दिलं होती.
”थॅंक्स”
”आज काय स्पेशल एकदम तयार होऊन आलायसं, भरपूर शॉपिंगपण केलेली दिसतेय.” पिशव्यांकडे नजर टाकत तिनं विचारलं.

”हो स्पेशलच आहे”
”बरं”
”तू बसं ना, माझ्या अॅक्टिव्हावर मी डबल स्टँडवर गाडी लावतो” तिला केदारचं वागणं थोडं विचित्रच वाटलं, त्याने गाडी डबल सँडवर लावली मनाली त्यावर बसली, ती बसताच केदार हसला.

star pravah new serial yed lagla premach
‘येड लागलं प्रेमाचं’ : स्टार प्रवाहवर सुरू होणार नवीन मालिका! बैलगाडा शर्यतीचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले…
Sonu Sood WhatsApp retrieved after blocked for 61 hours shared posts on social media
अखेर ६१ तासांनी सुरू झालं सोनू सूदचं व्हॉट्सॲप, आले तब्बल ९ हजारांहून अधिक मेसेज; अभिनेता म्हणाला…
Ceiling fan cleaning tips
Jugaad Video: पंखा सुरु करण्याआधी ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; टेबल-खुर्ची न वापरता मिनिटांत होईल तुमचा पंखा स्वच्छ
Kapil Sharma Sunil Grover travelling on flight shared funny post on social media
“कृपया आता तरी भांडू नका”, ६ वर्षानंतर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवरचा पुन्हा एकदा विमानाने प्रवास; चाहते म्हणाले…

”हां बोल का बोलावलं इथे मला”
केदार काहीच बोलला नाही त्यानं दीर्घ श्वास घेतला आणि कॉन्फिडन्स गोळा करून आजूबाजूला कोणी पाहत नाही ना याची खात्री करून घेत तो गुडघ्यावर बसला आणि त्यानं थेट गायलाच सुरुवात केली.

”काकडीचा बांधा तुझा, मिरचीचा तोरा
मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा
लिंबावानी कांती तुझी, बीटावानी ओठ
टंमाट्याचे गाल तुझे, भेंडीवानी बोटं

काळजात मंडई तू मांडशील काय
अगं रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय?”
शेवटंच वाक्य संपवत त्याने तिच्याकडे पाहिलं. ती जोरजोरात हसायला लागली.
”अरे हे काय?”
त्यानं हातातल्या सगळ्या पिशव्या मनालीच्या हातात दिल्या. ”हे घे” तिनं हसू आवरत त्या पिशव्या उघडल्या.
एका पिशवीत भेंडी, दुसऱ्या पिशवीत टोमॅटो, तिसऱ्यात कांदे, चौथ्यामध्ये बटाटे हे पाहून ती पुरती गोंधळली. पण ती काही विचारणार एवढ्यात केदार उठून उभा राहिला

”तुला प्रश्न पडला असेल ना मनाली की मी या भाज्या तुला का दिल्या, तुला आठवतंय मी तुला पहिल्यांदा बाजारात पाहिलं होतं… भाजी घेताना. पहिल्याच नजरेत मला तू खूप आवडलीस त्यातूनही सगळ्यात जास्त आवडलं मला तुझे हे तपकिरी रंगाचे डोळे. त्यानंतर मी तुला अनेकदा बाजारात पाहिलं आणि तेव्हाच ठरवलं लग्न करेन तर तुझ्याशीच मला तुला गिफ्ट द्यायचं होतं पण काय देऊ कळत नव्हतं म्हणून तुझ्यासाठी भाजीच विकत घेतली, तसंही हे तूझं आवडतं काम आहे ना आणि बरं का चांगला भाव करूनच आणली आहे भाजी”  हे ऐकून ती आणखी जोरात हसली, पण त्यानं तिच्या हसण्याकडं दुर्लक्ष करत दुसऱ्या एका पिशवीतून फुलकोबी बाहेर काढला आणि तिच्यासमोर पकडत I LOVE YOU असं म्हटलं. आधी त्याच्यावर हसणारी मनाली खूपच लाजली. केदारच्या या हटके प्रपोज करण्याच्या स्टाईलनं तिला इतकं इम्प्रेस केलं की ती त्याला नाही म्हणूच शकली नाही. तो फुलकोबी हातात घेत ती पुन्हा एकदा हसली आपलं हसू दाबत तिनं केदारला होकार दिला.

केदार आणि मनाली आता गर्लफ्रेंड ब्रॉयफ्रेंड झाले होते. केदारचं घरातलं वागणं बदलत चाललं होतं. आता आईलाही तो स्वत:हून मदत करायचा, अनेकदा तर न विचारताच घरात भाजी आणि इतर सामान घेऊन जायचा. आईला थोडं आश्चर्य वाटलं. न सांगताच केदार इतकं काम कसा काय करू लागला ती कोड्यातच पडली. भाजी कशी घ्यायची हे ही माहिती नसलेला मुलगा आता बाजारात जाऊन चांगली भाजी वगैरे आणत होता, आईसाठी तर हा धक्काच होता. अर्थात मनाली त्याला मदत करते हे आईला थोडंच माहिती होतं.
त्या दिवशी केदार आणि मनाली दोघंही फिरायला बाहेर गेले होते. बाबा आणि आई दोघंही घरी होते.
”अहो ऐकलंत का?”
”बोला आपलंच ऐकायला तर बसलोय मी” केदारचे बाबा खोडकरपणे बोलले.
”अहो आपला केदार जरा वेगळाच वागतो ना आजकाल?”
”वेगळा म्हणजे कसा, मी घरी थोडीच असतो त्याला बघायला.”
”अहो म्हणजे आजकाल मला मदत करतो, बाजारात वगैरे जाऊन भाजी आणून देतो तेही मी न सांगता”
”मग चांगलंय की”
”अहो तसं नाही म्हणजे तासन् तास फोनवरही बोलत असतो, त्यादिवशी व्हॉट्स अॅप व्हिडिओ कॉलवरही कोणाशीतरी बोलत होता. मी मागून बघितलं मुलगी होती. तुम्ही विचारा ना जरा”
”अहो मग बोलू दे की. वय आहे पोराचं प्रेमात पडण्याचं, आपण ही नाही का लव्ह मॅरेज केलं.”
”तसं नाही हो, म्हणजे कोणी बघितली असेल तर आपल्याला सांगायला काय हरकत आहे ना? आपण नाही थोडीच म्हणणार आहोत.” आई म्हणाली.
“हे बघा त्याला जे करायचंय ते करू दे. मुलांमध्ये आपण उगाच का लुडबूड करा. त्याला सांगायचं तेव्हा सांगेल की तो”

”अहो घाबरत असेल तो तुम्हाला. तुम्ही एकदा विचारून तर बघा. तसही मुलाचं लग्नाचं वय झालंय की आता” आईनं शेवटचा प्रयत्न करून पाहिला.
”बरं विचारतो” बाबांनी होकार दिल्यावर आईने सुस्कारा टाकला.
मनाली सोबत वरळीच्या कट्ट्यावर छान संध्याकाळ घालवल्यानंतर केदार घरी आला. आई आणि बाबा जेवणासाठी थांबले होते. केदार हात धुवून डायनिंग टेबलवर बसला. आईनं खाणाखुणा करून बाबांना विचारायला सांगितलं, योग्य ती वेळ पाहून बाबांनी केदारला विचारलं, ”काय केदार जॉब वगैरे कसा काय चालू आहे सगळं ठिक ना?”
”हो एकदम मस्त”
”ओके मग काय कोणी बघितली की नाही?”
बाबांनी एकदम असं विचारलेलं पाहून त्याला ठसकाच लागला. बाबांशी त्याचं फार काही जमायचं नाही किंवा बाबांनी यापूर्वी त्याला असं काहीचं विचारलं नव्हतं, त्यामुळं आपल्या आणि मनालीच्या अफेअरबद्दल काही सांगितलं तर बाबा कसं रिअॅक्ट करतील हे त्याला माहिती नव्हतं.
”नाही बाबा तसं काहीच नाही” त्यानं विषय टाळला.
”अरे नको सांगू, पण मीही तुझा बाबा आहे. ती कोण ते शोधून काढेनच मी” बाबा मनातल्या मनात म्हणाले.
जेवण झाल्यावर केदार बाहेर गेला आणि त्याने मनालीला फोन लावला.
”हाय, जेवलीस का?”
”हो जस्ट, तू?”
”हो मी पण, तू कामात नसशील तर बोलूयात का? मला बोलायचं आहे”

”हो बोल ना”
”आज बाबांनी मला विचारलं, तुझं बाहेर कुठं अफेअर सुरू आहे का?”
”मग? तू सांगितलंस का त्यांना?”
”वेडी आहेस का तू… त्यांना सांगायला. ते कसे रिअॅक्ट करतील मला माहिती नाही. उगाच नकार वगैरे दिला तर मला तुला भेटताना प्रॉब्लेम यायचा” केदार काळजीच्या स्वरात म्हणाला. ”पण तूच तर सांगितलंस ना की त्यांचं लव्हमॅरेज आहे मग तुला का आडवतील?”

”हा ते तर आहेच, पण रिस्क कशाला घ्या. थोडे दिवस थांबूयात मग सांगतो”
”बरं चल मी ठेवते आता खूप रात्र झालीये. गुड नाईट लव्ह यू”
केदारने फोन ठेवला आणि तो झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला जायला निघायला. मनालीसोबत अफेअर सुरु झाल्यापासून केदार घरातून लवकरच निघायचा, मनालीला पिक करायचा तिला आधी ऑफिसमध्ये सोडायचा मग तो पुढे ऑफिसला निघायचा.
”काय रे ऑफिसला आजकाल खूप लवकरच जातो आणि येतोही उशीरा खूप काम असतं का तुला?” बाबांनी विचारलं.
बाबा आणखी काहीतरी प्रश्न विचारणार पाहून केदार उठला
”हो खूप काम असतं. नवा प्रोजेक्ट घेतलाय ना त्याचच काम असतं.”
बाबा मनातल्या मनात हसले. ”याचा नवा प्रोजेक्ट शोधून काढलाच पाहिजे.”
केदार निघाल्यावर बाबांनीही गाडी काढली. बाबा आपल्या मागावर आहे हे केदारला कळलंच नाही, केदारने पुढे आपली बाईक थांबवली, त्याचबरोबर मागून एक मुलगी येऊन केदारच्या पाठीमागे बसली. तिने आपल्या पर्समधून स्कार्फ काढला आणि चेहऱ्यावर बांधला. बाबांनी तिला नीट बघण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काही ती दिसली नाही. केदारने गाडी सुरू केल्यानंतर सुरक्षित अंतर ठेवून बाबा गाडी चालवत होते. केदारने त्या मुलीला एकाबिल्डिंगखाली सोडलं आणि तो पुढे गेला. बाबांनी गाडी मागे फिरवली,

(क्रमशः)
– तीन फुल्या, तीन बदाम

 

© सर्व हक्क सुरक्षित