वाढत्या उकाडय़ामुळे पश्चिम रेल्वेवर चालविल्या जाणाऱ्या एकलत्या एक वातानुकूलित लोकलला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एप्रिल २०१९ मध्ये तब्बल ४ लाख ४७ हजार ५४० प्रवाशांनी या गाडीने प्रवास केला. त्याआधीच्या वर्षांत प्रत्येक महिन्यात सरासरी हाच आकडा ३ लाख ९२ हजार एवढा होता. या प्रवाशांना रेल्वेनेही भाडेवाढ न करण्याचा निर्णय घेऊन दिलासा दिला आहे.

वातानुकूलित लोकलच्या भाडेदराची २४ एप्रिल २०१९मध्ये फेररचना होणार होती. परंतु, ३१ मे २०१९पर्यंत त्यात कोणताही बदल केला जाणार नसल्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. महिनाभर या गाडीचे दर ‘जैसे थे’च राहणार आहेत.

Even during the rainy season rickshaw-taxi drivers continue to refuse fares
पावसाळ्यातही रिक्षा-टॅक्सी चालकांकडून भाडे नाकारणे सुरूच
kenya protests over tax raise bill
केनियात करवाढीविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर; आक्रमक जमावाकडून संसदेला आग लावण्याचा प्रयत्न
drunken man was pelting the young man with a stone video goes viral
वर्धा : दारूडा ‘त्याला’ दगडाने ठेचत होता; लोकांची मात्र बघ्याची भूमिका! काही जण व्हिडिओ काढण्यात व्यग्र…
Six police personnel hastily suspended for financial transactions in copper theft case
वर्धा : सहा पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या काय आहे कारण…
License for Ola and Uber in pune, State Appellate Tribunal give next day 8 July, ola uber ac taxi, ola uber in pune, marathi news,
पुण्यात ओला, उबरचे काय होणार? जाणून घ्या कधी होणार अंतिम निर्णय…
Safe Driving Tips
कारचे गिअर बदलण्यापूर्वी ब्रेक दाबावे की नाही? अपघाताचा धोका टाळण्यासाठी प्रत्येक कार चालकाला ‘हे’ माहित असायलाच हवं!
womans right to decide on abortion
गर्भपाताचा निर्णय घेण्याचा अधिकार महिलेचाच!
Amazon warehouse
‘टार्गेट पूर्ण करेपर्यंत लघवीलाही जाता येणार नाही’, Amazon India च्या जाचक अटी; महिलांना तर…

२५ डिसेंबर २०१७ रोजी पहिली वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते चर्चगेट दरम्यान धावली. या गाडीच्या दिवसाला बारा फेऱ्या होतात. मात्र यामुळे सामान्य गाडय़ांच्या बारा फेऱ्यांवर गदा आल्याने वातानुकूलित गाडीविरोधात बरीच आरडाओरड झाली. त्यातच चर्चगेट ते विरापर्यंत २०५ रुपये तिकीट व महिन्याच्या २,०४० रुपये पासामुळे प्रवाशांना चांगलाच घामही फुटला. त्यामुळे अवाच्या सव्वा भाडे, गाडीची गैरसोयीची वेळ इत्यादी कारणांमुळे प्रवाशांकडून कमी प्रतिसाद मिळू लागला. बारा फेऱ्यांपैकी सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळेतील तीन ते चारच फेऱ्यांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळतो. परंतु उन्हाळ्यात या गाडीचा प्रतिसाद वाढतो.

एप्रिल २०१९ मध्ये एकूण ४ लाख ४७ हजार ५४० प्रवाशांनी प्रवास केला आहे. दररोज तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ३२ हजार १३६ आणि महिन्याच्या पासावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ४ लाख १५ हजार ४०४ एवढी आहे. एप्रिल महिन्यात प्रवासी संख्येत वाढ झाल्याने पश्चिम रेल्वेला तेवढेच चांगले उत्पन्न मिळाले आहे. १ कोटी ८३ लाख ६४ हजार रुपयांची कमाई रेल्वेने केली आहे. २०१८-१९ शी तुलना करता या वर्षांतील प्रत्येक महिन्यात प्रवासी संख्या सरासरी ३ लाख ९२ हजार एवढी होती.

५८ लाख प्रवासी, २३ कोटी रुपये महसूल
पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकल डिसेंबर २०१७ मध्ये सुरू झाली. आतापर्यंत या लोकलमधून ५८ लाख ८४ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर २३ कोटी ९२ लाख ४३ हजार रुपयांचा महसूलही रेल्वेला मिळाला आहे.