मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांविरोधात आर्थिक गैरव्यवहारांचे पुरावे असल्याचा दावा करणाऱ्या तरुण परमार या वकिलाची सोमवारी सक्तवसुली संचलनायाने(ईडी) चौकशी के ली. गेल्या आठवडयात ईडीने त्यांना समन्स बजावत चौकशीसाठी बोलावले होते.

परमार सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास काही कागदपत्रांसह ईडीच्या दक्षिण मुंबईतील विभागीय कार्यालयात हजर झाले.  देशमुख, मंत्री नितीन राऊत यांच्यासह काही प्रशासकीय अधिकाऱ्यांबाबतची माहिती आपण ईडी अधिकाऱ्यांना दिली, हवाला व्यवहारांबाबत उपलब्ध तपशील दिले, असा दावा परमार यांनी माध्यमांशी बोलताना केला.

दरम्यान, देशमुख हे मंगळवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहाण्याची शक्यता आहे. गेल्या आठवडय़ात ईडीने त्यांना समन्स जारी करून चौकशीसाठी बोलावले होते. मात्र देशमुख यांनी वकिलाला पाठवून मुदत मागून घेतली. ईडीने दुसरे समन्स बजावत देशमुख यांना मंगळवारी चौकशीस बोलावले आहे.

मुंबईतील बार मालकांकडून लाच म्हणून उकळलेल्या रक्कमेतील चार कोटी १७ रुपये देशमुख यांनी नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेत वळविल्याचा दावा ईडीने न्यायालयात के ला होता.

ही रक्कम देणगी स्वरुपात प्राप्त झाल्याचा आभास निर्माण करण्यासाठी दिल्लीतील दोन व्यक्तींना देशमुख यांचे चिरंजीव ऋषीके श यांनी नागपूरहून रोख रक्कम पाठवली. या दोन व्यक्तींनी ही रक्कम देशमुख अध्यक्ष असलेल्या शिक्षण संस्थेच्या खात्यांवर जमा के ली, असेही ईडीने न्यायालयात सांगितले .

या संशयास्पद आर्थिक गैरव्यवहारांमध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवत ईडीने देशमुख यांच्या दोन सहायकांना गेल्या आठवडय़ात अटक के ली होती.