राज्याचे पोलीस महासंचालक अरविंद इनमादार यांचे मुंबईतील हरकिसनदास रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. न्यायप्रिय, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असा त्यांचा लौकिक होता. पोलीस दलातल्या चुकीच्या आणि अयोग्य गोष्टींवर त्यांनी उघडपणे टीका केली. अरविंद इनामदार हे लेखक म्हणूनही प्रसिद्ध होते.
Arvind Inamdar, former Maharashtra Director General of Police (DGP) passed away, earlier today. pic.twitter.com/xwZ7jOZeft
— ANI (@ANI) November 8, 2019
इनामदार यांनी जळगाव सेक्स स्कँडलचं प्रकरण यशस्वीपणे हाताळलं होतं. चुकीचे काहीही घडले तर ते त्यावर उघडपणे आणि परखडपणे बोलत असत. पोलीस दलातील वाईट गोष्टींवर बोलल्याचा फटका आपल्याला नेहमीच बसला असंही ते उघडपणे सांगत असत.
अरविंद इनामदार हे पोलीस दलात असूनही अत्यंत संवेदनशील मनाचे होते. त्याचमुळे त्यांनी त्यांच्या तत्त्वांशी आणि मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. उत्तम भाषाशैली, चांगलं लिखाण आणि विनोदबुद्धी यामुळे ते ऐकणाऱ्याच्या मनाची ते सहज पकड घेत असत. अशा या पोलीस अधिकाऱ्याचं निधन झालं आहे.
त्यांच्या पार्थिवावर चंदनवाडी स्मशानभूमीत सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव ९.३० ते १०.३० या वेळेत अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आलं होतं.