ताऱ्यांच्या यादीत झळकण्याची संधी
महाराष्ट्रातील अव्वल दर्जाच्या पहिल्यावहिल्या राज्यस्तरीय ‘लोकसत्ता लोकांकिका-२०१४’ आंतर महाविद्यालयीन स्पर्धेच्या रंगमंचावर तावून सुलाखून निघालेले प्रतीक गंधे, निनाद गोरे, अनुजा मुळ्ये, श्रीकांत भगत आणि पवन ठाकरे आज चित्रपट व मालिकांमध्ये चमकत आहे. या ताऱ्यांच्या यादीत झळकण्याची नामी संधी तुम्हालाही मिळू शकते. त्यासाठी ‘लोकसत्ता-लोकांकिका’चे दुसरे पर्व तुम्हाला खुणावते आहे. मंगळवार हा अर्ज सादर करण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुकांनो, ही
दवडू नका!
‘लोकसत्ता लोकांकिका-२०१४’ स्पर्धेतील एकांकिकांमधील त्यांचा अभिनय गाजला. या स्पर्धेला आलेल्या मातब्बरांनी तो हेरला. आयरिस प्रॉडक्शन्स ही तर या स्पर्धेची टॅलेन्ट पार्टनरच. त्यांनी स्पर्धेतील या गुणवंतांना छोटय़ा पडद्यावर चमकण्याची संधी दिली. याच संधीची दारे आता राज्यातील विविध महाविद्यालयांतील नाटय़वेडय़ा तरुणाईला खुणावत आहेत.
‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफिस’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसाठी रंगमंचही सज्ज झाला आहे. स्पर्धेच्या आठही विभागांतील स्पर्धा केंद्रेही जाहीर झाली असून २९ सप्टेंबरपासून राज्यभरात ही नाटय़धुमाळी सुरू होणार आहे.
नामवंतांचे सहकार्य
‘झी मराठी नक्षत्र’ हे टेलिव्हिजन पार्टनर लाभल्याने विविध टप्प्यांवर ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचा आस्वाद जगभरातील रसिकांना घेता येणार आहे. ‘अस्तित्व’ या संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी ९३.५ रेड एफएम हे रेडिओ पार्टनर म्हणून काम पाहणार आहेत. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांना हेरण्यासाठी ‘आयरिस प्रॉडक्शन्स’ हे ‘टॅलेंट पार्टनर’ आहेत. यंदा ‘स्टडी सर्कल’ही या स्पर्धेत ‘नॉलेज पार्टनर’ म्हणून सहभागी झाले आहेत.
या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेमुळे राज्यातील अनेक कलाकारांना एकांकिकेत सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच राज्यातील नाटय़रसिकांसाठीही या स्पर्धेमुळे नाटय़ोत्सवाचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, रत्नागिरी, पुणे, ठाणे आणि मुंबई या आठ केंद्रांवर महाविद्यालये स्पर्धेसाठीचा अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत आहे मंगळवार, १५ सप्टेंबर. विभाग, स्पर्धाकेंद्रे आणि दिनांक आदी माहितीसाठी भेट द्या : indianexpress-loksatta.go-vip.net/lokankika2015

Story img Loader