काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दावा

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचे सांगतानाच २०२४च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत येईल, असा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्याने आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवाव्या या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिके च्या विरोधात भूमिका घेतली आहे.

मुंबईसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढविण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली आहे. परंतु पटोले यांनी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त करतानाच आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष असेल, असे भाकीत व्यक्त करीत शिवसेना आणि राष्ट्रवादीवर कु रघोडी के ली आहे.

राज्यातील पक्षाचा जनाधार वाढविण्याकरिता महानगरपालिके सह सर्व निवडणुका स्वबळावर लढविणे आवश्यक असल्याचे मत  प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसिम खान यांनी व्यक्त के ले.  राज्यात सध्या काँग्रेस चौथ्या  क्र मांकाचा पक्ष आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पहिल्या क्र मांकाचा पक्ष होईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त के ला आहे.