राज्यात एकीकडे करोनाचे रुग्ण वाढत असल्याने लोकांना चिंता सतावत असताना दुसरीकडे दिलासा देणाऱ्या काही घटनाही समोर येत आहेत. अशीच एक घटना समोर आली असून सायन रुग्णालयात दाखल एक महिन्याच्या बाळाने करोनावर मात केली आहे. करोनावर मात केल्यानंतर बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून यावेळी नर्स, डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना टाळ्या बाजवून बाळ आणि त्याच्या आईला निरोप दिला.

रुग्णालयातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत बाळाची आई त्याला कुशीत घेऊन वॉर्डमधून बाहेर येत असताना नर्स, डॉक्टर आणि कर्मचारी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करत असल्याचं दिसत आहे. करोनावर मात करणारं हे सर्वात लहान वयाचं बाळ ठरलं आहे. व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर नेटिझन्सदेखील सायन रुग्णालयातील डॉक्टर आणि इतरांचं कौतुक करत आहेत.

एप्रिल महिन्यात दोन महिन्यांच्या बाळाने करोनावर मात केली होती. २२ एप्रिल रोजी बाळाला त्याच्या तीन वर्षांची बहिण आणि आईसोबत सैफी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. तर इंदूर येथे दोन महिन्यांचं बाळ करोना पॉझिटिव्ह आढळलं होतं. खासगी रुग्णालयात बाळाला दाखल करण्यात आलं होतं. करोनावर मात केल्यानंतर बाळाला घरी पाठवण्यात आलं होतं.

Story img Loader