आज सर्वत्र दहीहंडीचा उत्सव सुरु असताना या उत्सवाला गालबोट लागले आहे. धारावीत थर रचताना चक्कर येऊन पडल्याने २७ वर्षीय कुश खंदारे याचा मुत्यू झाला आहे.  धारावी बाळ गोपाळ पथकाचा हा गोविंदा होता. सायन रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कुशला सायन रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला लगेच मृत घोषित करण्यात आले.

दरम्यान, दहिहंडीसाठी मानवी मनोरे रचताना आतापर्यंत ६० गोविंदा जखमी झाले असून यांपैकी ४० जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. यात धारावीतील २७ वर्षाच्या कुश खंदारे या गोंविदाचा मृत्यू झाला आहे. पहिल्या थरावर असताना फिट आल्याने तो थरावरून खाली कोसळला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले होते. पण दाखल केल्यानंतर त्याला लगेच मृत घोषित करण्यात आले.

Story img Loader