ठाण्याच्याजवळ असलेल्या कळवा स्टेशनलगत आग लागल्याने मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत. या ठिकाणी अग्निशमन दलाचा एक बंब दाखल झाला आहे. अंडरग्राऊंड केबलमधून ठिणग्या उडाल्या आणि ही आग लागली असंही समजतं आहे. ही आग लागल्यानंतर ट्रॅकजवळ असलेल्या कचऱ्यानेही पेट घेतला. या सगळ्यामुळे धीम्या लोकलने प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे.

धीम्या लोकलची वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आल्याने घरी जाणाऱ्या चाकरमान्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो आहे. एकामागोमाग एक ट्रेन उभ्या होत्या. अनेक प्रवाशांना सुरुवातीला काय घडलं? ते समजलेलं नाही. त्यानंतर आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसले. ज्यानंतर काय घडलं आहे त्याचा उलगडा अनेकांना झाला.

Story img Loader