अभिनेता सलमान खानच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा अखेर गुरूवारी निकाल लागला. मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून एकाच्या मृत्यूस व चौघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याच्या आरोपातून सलमान खानची निर्दोष मुक्तता झाली. सरकारी पक्ष सलमानवरील आरोप सिद्ध करण्यात अपयश ठरल्याचे उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले.
याआधी सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात सलमानने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर गेल्या १३ वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याचा बऱयाच वळणांनंतर आज निकाल लागला. खटला सुरू असतानाच्या काळात सलमानवर सदोष मनुष्यवधाचा नवा आरोप निश्चित करण्यात आला. त्यावेळी आपल्यावर जर नव्याने आणि तोही गंभीर स्वरूपाचा आरोप ठेवण्यात येत आहे तर खटलाही नव्याने चालविण्यात यावा, अशा मागणीनंतर २०१३ साली सलमानच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणाची नव्याने सुनावणी सुरू करण्यात आली होती. नव्याने सुनावणी सुरूवात झाल्यापासून ते आज निकाल लागण्यापर्यंतचा या हायप्रोफाईल ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा प्रवास…