* खडसे यांच्या निकटवर्तीयाला ३० कोटींच्या लाचप्रकरणी १४ मे रोजी अटक. खडसे यांच्या जवळच्याच्या अटकेमागे काही तरी काळेबेरे असल्याची तेव्हाच चर्चा सुरु. पकडण्यात आलेला पाटील हा तीन महिने रडावर होता या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानाने संशय वाढला. खडसेंकडून इन्कार.
* दाऊदच्या कराचीतील निवासस्थानातील दूरध्वनी क्रमांकावरून खडसे यांच्या मोबाइलवर दूरध्वनी आल्याचा हॅकर मनीष भंगाळे यांचा आरोप. दाऊदच्या कथित संभाषणामुळे खडसे यांच्या अडचणींमध्ये वाढ होऊ लागली. आम आदमी पार्टीच्या प्रिती मेनन शर्मा यांनी कागदपत्रांच्या आधारे आरोप केले
* पुण्यातील भोसरीतील जमीन पत्नी व जावयाच्या नावे खरेदीसाठी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप झाला.
* खडसे यांच्या विरुद्ध कारवाईसाठी न्यायालयात याचिका सादर तर पदाचा दुरुपयोग केल्याने पुण्यात पोलिसात तक्रार दाखल.
* खडसे यांच्यावर दररोजच आरोपांची मालिका
* समाजसेविका अंजली दमानिया यांनी आझाद मैदानात उपोषण सुरू केले

सोमवार : खडसे यांना मुख्यमंत्र्यांनी पाचारण केले आणि माहिती घेतली
मंगळवार:  मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारून खडसे मुक्ताईनगरमध्ये. तेव्हाच कल्पना आली होती .
बुधवार:  अमित शहा यांनी खडसे यांच्याबद्दलचा अहवाल मागविला.
गुरुवार:  मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे अहवाल सादर केला. पक्षाकडून कारवाईचा उचित निर्णय घेतला जाईल, या मुख्यमंत्र्यांच्या विधानाने खडसे यांची हकालपट्टी निश्चित झाल्याचा संदेश गेला
शुक्रवार:  विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षाने भरलेला अतिरिक्त जागेवरील अर्ज मागे घेतला. तेव्हाच कारवाईचे संकट. इकडे मंत्रिपद वाचविण्याकरिता खडसेंचा आटापिटा. नागपूरला जाण्याची तयारी, पण सरसंघचालक मोहन भागवत यांनी भेट नाकारली. गडकरी यांच्या माध्यमातून शेवटचा प्रयत्न. मुख्यमंत्र्यांनी मदतीस असमर्थता व्यक्त केली होती .
शनिवार:  मुख्यमंत्र्यांनी केले खडसे यांना पाचारण केले, सकाळी ११.३० वाजता खडसे ‘वर्षां’ बंगल्यावर. पाठोपाठ मुनगंटीवार, तावडे पोहचले. राजीनाम्याचा पक्षाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी खडसे यांना कळविला. खडसे यांच्यापुढे पर्यायच नव्हता तरीही पक्षाकडून भविष्यासाठी मदतीची अपेक्षा. दुपारी भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत सारे आरोप फेटाळले. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारला आणि राज्यपालांकडे पाठविला.