मुंबईतील लालबागचा राजाचे विसर्जन करण्यात आले आहे. थोड्याच वेळापूर्वी तराफ्यावर बसवून लालबागच्या राजाची आरती करण्यात आली. त्यानंतर बाप्पाचा समुद्राकडे प्रवास सुरू झाला. मंगळवारी सकाळपासून मिरवणुकीत असलेला हा गणपती अखेर पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात बाप्पाला निरोप दिला आहे. लालबागच्या राजाचे विसर्जन होण्याआधी कोळी बांधवांनी लालबागच्या राजाला सलामी दिली. लालबागच्या राजाचे विसर्जन होण्यासाठी अपेक्षेप्रमाणे सकाळ झाली आहे. थोड्याच वेळापूर्वी लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले.

दरम्यान मुंबईतील गिरगाव, जुहू आणि इतर ठिकाणी मंगळवारी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली होती. गेले १२ दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणपतीला निरोप देण्यासाठी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांसह अन्य विसर्जनस्थळांवर होणारी भाविकांची अलोट गर्दी लक्षात घेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिका सज्ज झाली आहे. अजूनही चौपाटीवर विसर्जन सुरू आहे.

Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
aam aadmi party protest kolhapur marathi news
ईडीच्या नावाने बोंब मारून कोल्हापुरात केजरीवालांच्या अटकेचा निषेध; आपची प्रतीकात्मक होळी
drug dealer died because of heart attack after seeing the police
पुणे : पोलिसांना पाहताच अमली पदार्थ विक्रेत्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

 

गणपतीसंदर्भातील Updates 

लालबागच्या राजाच्या मागे असलेली प्रभावळ काढण्यास सुरूवात

पहाटे ६.१५ च्या सुमारास लालबागचा राजा तराफ्यावर

लालबागचा राजा पहाटे ५.४५ च्या सुमारास गिरगाव चौपाटीत दाखल

पहाटे चार वाजताही मुंबईत विसर्जन मिरवणुका सुरूच

डोंगरीच्या राजाची पहाटे ५ वाजता आरती

कुंभारवाड्याचा राजाची मिरवणूकही सुरूच

फोर्टच्या राजाचीही मिरवणूक सुरूच

माझगावचा राजाही मिरवणुकीच्या रांगेत

 

डोंगरीचा राजा

 

फोर्टचा राजा

गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना सेवा-सुविधा मिळाव्या यासाठी विसर्जनस्थळांवर तब्बल ८,६०४ पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला असून गणेश विसर्जनाच्या निमित्ताने भाविकांनी समुद्रात उतरू नये यासाठी ५० जर्मन तराफे सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तब्बल ६०७ जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. दुसरीकडे, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली असून सुमारे ३६०० पोलीस अधिकारी व कर्मचारी, ५०० वाहतूक वॉर्डन आदी सुरक्षा व्यवस्थेसाठी मुंबईभरात तैनात केले आहेत. संपूर्ण मुंबईत ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त गर्दीच्या ठिकाणी देखरेख करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.

अखेर जीवरक्षकांना विमाकवच

गिरगाव, दादर, जुहू आदी विविध ठिकाणचे समुद्रकिनारे, तलाव आणि कृत्रिम तलाव आदी १०१ विसर्जनस्थळांवर गणेश विसर्जनासाठी येणारे भाविक आणि हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिकाही सज्ज झाली आहे. गिरगाव, दादर, जुहू या समुद्रकिनाऱ्यांसह ६९ नैसर्गिक विसर्जनस्थळे आणि पालिकेच्या ३२ कृत्रिम तलावांवर भाविकांची अलोट गर्दी होते. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने १०१ विसर्जनस्थळांवर ७४ प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्था केली असून तब्बल ६० रुग्णवाहिका सज्ज ठेवल्या आहेत. गणरायाला निरोप देण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी तब्बल ८७ स्वागत कक्ष, गणेशमूर्तीसोबत विसर्जनस्थळांवर घेऊन येणाऱ्या निर्माल्यांसाठी २०१ निर्माल्य कलश, निर्माल्य वाहून नेण्यासाठी १९२ डम्पर, ११८ तात्पुरती शौचालये आदी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विसर्जनस्थळांवर रात्री लख्ख उजेड असावा यासाठी तब्बल १९९१ फ्लडलाईट आणि १३०६ सर्चलाईटचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशमूर्तीची ट्रॉली अडकू नये म्हणून समुद्रकिनाऱ्यांवर वाळूमध्ये ८४० स्टील प्लेट टाकण्यात आल्या आहेत.

मुंबईतील वाहतूक मार्गांमध्ये बदल; विशेष लोकल धावणार

 updates:

* गिरगाव चौपाटीवर थायलंडमधील गणेशभक्तांनी गणपतीचे विसर्जन केले. मुख्यमंत्र्यांनी केली आरती. ट्रायडंटमध्ये बसवला जातो गणपती.

* मुंबईतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव अशी ख्याती असलेला केशवजी चाळ गणपती. पालखीतून लेझीमच्या तालावर गणपती चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ

* भांडुपमध्ये गणेश मिरवणुकीत वाद, डीजे बंद करायला लावल्याने मिरवणुका थांबल्या

* मुंबईत आत्तापर्यंत ३३० सार्वजनिक तर ९,०२५ घरगुती गणपतींचे  विसर्जन

* रंगारी बदक चाळचा गणपती गिरगाव चौपाटीवर पोहोचला.

* गिरगाव चौपाटीवर आदित्य ठाकरेंचे आगमन, गणेश विसर्जनाचा घेतला आढावा.

 

गिरगाव चौपाटीवर भक्तांची अलोट गर्दी, तेजूकाया, खेतवाडीतील गणपती विसर्जनासाठी चौपाटीवर.

घाटकोपर: विसर्जन मिरवणुकीत फटाक्यांच्या धुराचा भाविकांना त्रास, ५० हून अधिक भाविक रुग्णालयात दाखल (टीव्ही वृत्त)

मुंबई: काळाचौकी सार्वजनिक मंडळाचा महागणपती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गणपती मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन

खेतवाडीचा विघ्नहर्ता

‘चिंचपोकळीचा चिंतामणी’वर पुष्पवृष्टी

‘मुंबईच्या राजां’ची विसर्जन मिरवणूक थाटामाटात, भाविकांचा जल्लोष

व्हिडिओ पाहा: ‘लालबागचा राजा’ची विसर्जन मिरवणूक

माटुंगा येथील प्रगती सेवा मंडळाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत पुष्पवृष्टी

लोअर परळच्या राजावर पुष्पवृष्टी

मुंबईतील अनेक घरगुती गणपतींचे विसर्जन

अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळाचा गणपती.

मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिला.

गणेश गल्लीचा राजा

मुंबई: रंगारी बदक चाळीचा गणपती.

मुंबईचे राजे थाटात मार्गस्थ

मुंबई: रंगारी बदक चाळीचा गणपती मार्गस्थ

मुंबई: ‘लालबागचा राजा’ मुख्य प्रवेशद्वारातून मार्गस्थ

‘लालबागचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीत भक्तांचा जल्लोष

‘लालबागचा राजा’ थाटात मार्गस्थ

‘लालबागचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

‘गिरगावचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात

लालबागच्या राजाच्या निरोपाची तयारी

मुंबई महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात घरगुती गणपतींचे विसर्जन करताना भाविक.

‘लालबागचा राजा’ची विसर्जन मिरवणूक थोड्याच वेळात…

मुंबईतील पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ केशवजी नाईक चाळीच्या गणपतीला सचिन तेंडुलकरचा भाऊ अजित तेंडुलकर याने भेट दिली.

मुंबई: गिरगावचा महाराजा.

मुंबईत ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर

गणेश गल्लीचा राजा आयकर कार्यालयासमोर दाखल…लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईकरांची गर्दी

गणेश गल्लीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

* मिरवणुकीदरम्यान गणेश गल्लीच्या राजावर पुष्पवृष्टी
* परळचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ; मिरवणुकीला सुरुवात

* कोल्हापूरमध्ये गणेश विसर्जन सुरू, पाहिली मूर्ती पंचगंगा घाटावर पोहचली
* गणेश गल्लीचा राजा मंडपातून मार्गस्थ; मिरवणूक सोहळ्याला सुरुवात
* थोड्याचवेळात मुंबईतील मानाचा गणपती असलेल्या गणेश गल्लीच्या राजाच्या मिरवणूक सोहळ्याला सुरुवात
* वाहतूक पोलिसांचे ३ हजार ५०० अधिकारी-कर्मचारी सज्ज आहेत, त्याचबरोबर ५०० ट्रॅफिक वॉर्डन तयार
* मुंबईत शंभर ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय
* बाप्पाच्या विसर्जनासाठी मध्य रेल्वेच्या आज विशेष फेऱ्या.