तालीम स्वरूपात झालेली प्राथमिक फेरी.. प्रयोग स्वरूपातील विभागीय अंतिम फेरीतील संघर्ष.. आणि आता मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत आपलीच एकांकिका महाराष्ट्राची लोकांकिका ठरवण्यासाठीची मेहनत.. या कसोटय़ांवर सिद्ध झालेल्या आठ दर्जेदार एकांकिका घेऊन राज्यभरातील आठ महाविद्यालये एकमेकांसमोर आज उभी राहतील. रंगमंचाच्या अंधाऱ्या पोकळीत प्रकाशझोत पडला की, लेखकाने लिहिलेले संवाद, दिग्दर्शकाला अभिप्रेत अर्थ कलाकारांच्या अभियनातून खुलू लागेल आणि दिवसभर नाटय़वेडय़ा रसिकांना मेजवानी मिळेल. राज्यातील विविध स्पर्धा गाजवलेल्या एकापेक्षा एक दर्जेदार एकांकिकांमधून निवड होईल महाराष्ट्राच्या ‘लोकांकिके’ची! महाअंतिम फेरीचे लाइव्ह अपडेट्स येथे वाचा.
Live Updates