‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ करिअर कार्यशाळेद्वारे दोन दिवसीय मार्गदर्शनसत्र

करिअरचा मार्ग स्पष्ट होण्यासाठी आधी या मार्गाची नीट ओळख होणे आवश्यक असते. म्हणूनच ‘लोकसत्ता’तर्फे मार्ग यशाचा ही करिअर कार्यशाळा आयोजित केली आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात करिअरच्या मळलेल्या वाटांसोबतच इतरही अनेक वेगळ्या वाटांची माहिती असणे, आवश्यक ठरते. त्यामुळेच या कार्यशाळेमध्ये निरनिराळे तज्ज्ञ निरनिराळ्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. ३१ मे १ जून रोजी ही कार्यशाळा सकाळी ९ ते ५ या कालावधीत रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी येथे होणार आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते. तर अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली ‘जेईई’ ही परीक्षा द्यावी लागते. पण या परीक्षांची योग्य माहिती नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्याचा एक बागुलबुवा तयार झाला आहे. या परीक्षांमध्ये कसे यश मिळवावे, त्यासाठी अभ्यासाच्या युक्त्या आणि क्लृप्त्या सांगतील, या विषयातील तज्ज्ञ शिक्षक.

अभ्यासाचा ताण, वाढती स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांवर ताण येतो. अशा वेळी यश-अपयशासारख्या गोष्टी ते उत्तम पद्धतीने हाताळू शकत नाहीत. हा ताण नाहीसा करण्यासाठी आवश्यक असते तज्ज्ञांचे मार्गदर्शन. म्हणूनच प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि डॉ. राजेंद्र बर्वे कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.

खेळ, जाहिरात क्षेत्र, आरजे यामध्येही करिअरच्या कशा प्रकारे संधी आहेत, याविषयी या क्षेत्रातील तज्ज्ञ माहिती सांगतील. नीता ताटके आणि वर्षां उपाध्ये या क्रीडा तज्ज्ञ खेळांतील करिअरविषयी बोलतील तर आरजे रश्मी वारंग आवाजाच्या करिअरची माहिती देतील. जाहिरात क्षेत्रातील करिअरविषयी याच क्षेत्रातील उच्चपदस्थ अभिजित करंदीकर मार्गदर्शन करतील.

करिअर घडवायचे म्हणजे नेमके काय करायचे? आवडती शाखा कशी निवडावी? आपल्या आवडीनिवडींचे काय करायचे? याविषयी प्रसिद्ध करिअर समुपदेशक विवेक वेलणकर विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

दहावी, बारावीनंतरच्या संधी तसेच उच्चशिक्षणाच्या वाटा याबद्दलही ते विशेष मार्गदर्शन करतील. या करिअर कार्यशाळेत दोन्ही दिवस सारखेच विषय आणि वक्ते असतील. तसेच सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

प्रवेशिका कुठून मिळवाल?

  • प्रत्येक दिवसाचे ५० रुपये इतके शुल्क भरून प्रवेशिका मिळतील. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात खालील ठिकाणी प्रवेशिका मिळतील.
  • लोकसत्ता कार्यालय – दुसरा मजला, एक्स्प्रेस टॉवर्स, नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१
  • रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी
  • विद्यालंकार क्लासेस -विद्यालंकार हाऊस, प्लॉट नं. ५६, हिंदू कॉलनी, पहिली गल्ली, दादर (पूर्व)
  • यासोबत ऑनलाइन प्रवेशिकाही उपलब्ध आहेत. https://www.townscript.com//e/loksatta-marga-yashacha-mumbai-001230

प्रायोजक

या कार्यक्रमाचे टायटल पार्टनर आहेत, अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई. तर असोसिएशन पार्टनर आहेत, विद्यालंकार आणि एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी, पुणे. सपोर्टेड बाय पार्टनर्स आहेत, आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स. पॉवर्ड बाय पार्टनर्स आहेत, युक्ती, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, लक्ष्य अकॅडमी, अरेना अ‍ॅनिमेशन, आदित्य ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स, आयडीईएमआय, बाबासाहेब गावडे इन्स्टिटय़ूट, रिलायन्स एज्युकेशन, सासमिरा, श्रीनिवासन्स आयआयटी अ‍ॅकॅडमी. आणि हेल्थ पार्टनर आहेत, यूअरफिटनेस्ट.